Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जून महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे २ व ३ जून, मंचर येथे ९ व १० जून, जुन्नर येथे १६, १७ व १८ जून, वडगाव मावळ येथे २३ व २४ जून तर लोणावळा येथे २६ व २७ जून या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा ३० मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी कळविले आहे.
अर्ज कसा करावा –
शिकाऊ अनुज्ञप्ती काढून 30 दिवस झाल्यानंतर पक्क्या अनुज्ञप्तीच्या वाहन चालविण्याच्या चाचणी परिक्षेकरिता अर्ज करु शकतो.
आवश्यक कागदपत्रे –
– नमुना 4 (Form 4)
– शिकाऊ अनुज्ञप्ती
– नजीकच्या कालावधीत काढलेले तीन फोटो.
– वयाचा आणि पत्त्याचा केंद्रिय मोटार वाहन नियम 4 नुसार पुरावा.
– परिवहन संवर्गातील वाहनांकरिता अर्ज केल्यास मोटार ट्रेनिंग स्कूलचे नमुना ५ मधील प्रमाण्पत्र.
– शुल्क
– ज्या वाहनांवर चाचणी द्यावयाची त्या वाहनांची सर्व वैध कागदपत्रे.
चाचणी परिक्षा –
वाहनचालक चाचणी यशस्वीरित्या पार केल्यानंतर चालकास परवाना दिला जाईल. जर चालक वाहनचालक चाचणी पास करू शकला नाही तर तो सात दिवसांच्या कालावधी नंतर पुन्हा प्रयत्न करू शकतो. ( Pimpri Chinchwad RTO Monthly Visit Time Table June 2025 Read in Details )
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, चिखलमय रस्त्यांची डागडुजी करा ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! कृषी सहाय्यकांचा संप मिटला, सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य, आजपासून पुन्हा कर्तव्यावर
– मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबविण्यासाठी आमदार शेळकेंचा पुढाकार ; मंत्रालयातील बैठकीत मावळच्या प्रकल्पांसाठी विशेष मागणी