Dainik Maval News : घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील एका आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 12 लाख 34 हजार 97 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह गुजरातमध्ये देखील घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मोहम्मद रेहान आफताब शेख (वय 48, रा. वाघोली, पुणे. मूळ रा. गोवंडी, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चिंचवड स्टेशन चौकातील एक वाईन शॉप फोडून 10 लाख 75 हजारांचा ऐवज चोरीला गेला. ही घटना 23 जून रोजी सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणातील आरोपीचा पिंपरी पोलीस शोध घेत होते. ( Pimpri police arrested main accused in inter-state burglary gang )
पिंपरी पोलिसांनी तब्बल 300 सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढला. त्याच्या घरी जाऊन शोध घेतला असता आरोपी पोलिसांना हुलकावणी देऊन पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा आणखी शोध घेऊन वल्लभनगर बस स्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चिंचवड स्टेशन चौकातील वाईन शॉप फोडल्याचे सांगितले. तसेच त्याने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून पिंपरी, एमआयडीसी भोसरी, येरवडा, हडपसर, सहकारनगर, हिंजवडी पोलीस ठाणे तसेच गुजरात राज्यातील वडसाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ घरफोड्या केल्याचे सांगितले.
आरोपीकडून आलिशान कार आणि चोरीसाठी लागणारे साहित्य, बनावट नंबर प्लेट असा एकूण 12 लाख 34 हजार 97 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. सदरची कामगिरी अशोक कडलग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपरी पोलीस ठाणे, धनंजय कापरे पोलीस निरीक्षक (गुन्हे) पिंपरी पोलीस ठाणे, सुहास आव्हाड पोलीस निरीक्षक (गुन्हे) पिंपरी पोलीस ठाणे, पिंपरी तपास पथकातील सहायक पोलिस निरिक्षक दिगंबर अतिग्रे, पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, पोलीस उप निरीक्षक शाकिर जिनेडी, पोलीस उप निरिक्षक सावर्डे, पोलीस हवालदार बारशिंगे, हांडे, बेंदरकर, वारडे, शिंदे, अभंगराव, करपे, बंड, मुजावर, पोलीस शिपाई रेड्डी, जानराव, वाघमारे, काकड, आचार्य, बजबळकर, ढवळे, पुंडे, कवठेकर, भारती, महिला पोलीस हवालदार कोंडे, कोल्हे, चव्हाण यांनी केली आहे.
अधिक वाचा –
– खोपोलीकरांनी रचला इतिहास, आसमंतात फडकवला प्रचंड मोठ्या आकाराचा तिरंगा ध्वज । Khopoli News
– साताऱ्यातील ‘हे’ गाव ठरले महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम, काय आहे गावाचे वैशिष्ट्ये? नक्की वाचा
– रक्षाबंधनाच्या दिवशी तळेगावातील मायलेकींनी केलेल्या कृतीची सर्वत्र होतीये चर्चा ! आमदार सुनिल शेळकेंनीही केले कौतूक – पाहा व्हिडिओ