Dainik Maval News : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पुढील 30 वर्षांसाठीच्या एकात्मिक वाहतूक आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे. दरम्यान 20,550 चौरस मीटर एवढ्या क्षेत्रासाठी हा आराखडा तयार करण्यात आला असून, पुढील 30 वर्षांत पीएमआरडीएच्या हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गचे जाळे नियोजित आहे.
- यामध्ये रावेत ते राजगुरूनगर, गवळी माथा चौक ते शेवाळेवाडी, रावेत ते तळेगाव दाभाडे, चांदणी चौक ते हिंजवडी या 117 किमी मार्गाबरोबर लोणी काळभोर ते केडगाव, भूमकर चौक ते चिंचवड चौक या 46 किमी मार्गाचा समावेश आहे. या सहा नवीन बीआरटी मार्गामुळे पीएमआरडीएच्या हद्दीत वाहतुकीचा वेग वाढेल, असा निष्कर्ष काढण्यात आले आहे.
मात्र, सध्याची महामार्गाची अवस्था पाहता कोणत्याही ठिकाणी मुबलक जागा नाही. त्यामुळे आहे त्या मार्गावर रस्ता अरुंद पडत असून, वाहतूककोंडी होत आहे. त्यामध्ये आता बीआरटी बांधले, तर पुन्हा रस्ते अरुंद होऊन वाहतूक सुलभ न होता, कोंडीची शक्यता जास्त आहे.
हे आहेत प्रस्तावित बीआरटी मार्ग
1. रावेत ते राजगुरूनगर
2. गवळी माथा चौक ते शेवाळेवाडी
3. रावेत ते तळेगाव दाभाडे
4. चांदणी चौक ते हिंजवडी
5. लोणी काळभोर ते केडगाव
6. भूमकर चौक ते चिंचवड चौक
सध्याची बीआरटी संख्या
एकूण बीआरटी मार्ग – आठ
धावणाऱ्या बस – एक हजार
प्रवासी संख्या – सात लाख
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News