पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ( PM Kisan Yojana ) अंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना ई – केवायसी ( Online E-KYC ) करण्यासाठी आता काही दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांचे 100 टक्के ई-केवायची व्हावे, यासाठी अंतिम मुदत ही आता 9 सप्टेंबर 2022 पर्यंत असणार आहे.
मावळ तालुक्यात यासाठी गावोगावी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या विविध माध्यमातून प्रसिद्ध करणे, गाव पातळीवर काम करणारे तलाठी, कृषिसहाय्यक, ग्रामसेवक, पोलीसपाटील, कोतवाल यांनी लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क करणे, प्रचार प्रसिद्धी करणे, गावामध्ये सी.एस.सी. सेंटरच्या माध्यमातून कॅप लावून ई-केवायसीचे काम करण्यात आले आहे.
मावळ तालुक्यात अद्याप एकूण 5500 हजार लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी ( E – KYC ) करणे बाकी आहे. त्यांना आता दिनांक 9 सप्टेंबर 2022 पर्यंत ई-केवायसी करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता विनाविलंब ई-केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे. ( Date Extension For online E-KYC )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील पीएम किसान सन्मान निधी योजना ( PM-Kisan Samman Nidhi ) अंतर्गत पोर्टलवर नोंदणी झालेल्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना ई – केवायसी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी आपल्या गावातील कृषिसहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीसपाटील, कोतवाल यांच्याशी संपर्क करून तात्काळ पोर्टलवर ऑनलाईन ई-केवायसी 9 सप्टेंबर 2022 पर्यत करून घ्यावी, असे दत्तात्रय पडवळ (तालुका कृषि अधिकारी, मावळ) यांनी म्हटले आहे. ( PM-Kisan Samman Nidhi Date Extension For online E-KYC )
अधिक वाचा –
रामोशी समाजासाठी ‘राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन्याची घोषणा
मोठी बातमी! राज्यातील तब्बल 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर, वाचा संपूर्ण कार्यक्रम