बारा ज्योतिर्लिंग विकास परियोजनेतील श्री उज्जैन महाकाल मंदिर कॉरिडॉरचे ( Ujjain Mahakal Corridor ) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या हस्ते मंगळवार (11 ऑक्टोबर) रोजी उदघाटन झाले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी लोणावळा शहर भाजपा (Lonavla BJP ) यांच्यावतीने शहरात अनेक ठिकाणी भगवान शिवशंंकर मंदिरात आणि इतर मंदिरांत महाआरती घेण्यात आली. ( Mahaaarti By BJP Lonavla At Various Temples )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
View this post on Instagram
लोणावळा शहर भाजपाचे अध्यक्ष रामविलास खंडेलवाल, ज्येष्ठ नेते अरविंद कुलकर्णी, माजी नगरसेवक देविदास कडू, वृंदा गणात्रा, मंदा सोनवणे, विजय सिनकर, राजाभाऊ खळदकर, भाजयुमो अध्यक्ष शुभम मानकामे, जितेंद्र ललवाणी, सुनील गायकवाड, सुषमा कडू यांच्या उपस्थितीत लोणावळा शहरातील भांगरवाडी येथील श्री राम मंदिरात आरती करण्यात आली.
तसेच मावळ तालुक्यातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लोणावळा येथील सिद्धेश्वर मंदिरामध्ये महापूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी उज्जैन महाकाल मंदिर कॉरिडॉरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या उद्घाटन कार्यक्रमाचे नागरिकांसाठी थेट प्रक्षेपण करण्यात आले. ( PM Narendra Modi Opens Mahakal Corridor Ujjain Mahaaarti By BJP Lonavla At Various Temples )
अधिक वाचा –
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी महेश केदारी यांची नियुक्ती
लोणावळ्यात किरकोळ कारणातून सफाई कर्मचारी महिलेला मारहाण, तरुणावर गुन्हा दाखल, कोयता जप्त I Lonavla Crime