Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत मावळ तालुक्यातील रस्ते काँक्रीटीकरण कामांसाठी १५५ कोटी २६ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
मावळातील रस्ते यामुळे अधिक मजबूत, सुरक्षित व दर्जेदार होणार आहेत. वाहतुकीला गती, नागरिकांना सोयी आणि परिसराच्या विकासाला नवी चालना मिळणार आहे. मावळच्या सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
पुढील रस्ते विकास कामांना मान्यता :
१. तळेगाव चाकण रस्ता ते देहू येलवाडी रस्ता काँक्रीटीकरण करणे – ७३ कोटी ६७ लक्ष
२. मौजे कामशेत रेल्वे गेट नाणे खडकी फाटा प्रजिमा ७८ रस्ता काँक्रीटीकरण करणे – १३ कोटी २० लक्ष
३. मौजे माळवाडी वराळे ते कातवी प्रजिमा १०४ रस्ता काँक्रीटीकरण करणे – २० कोटी २५ लक्ष
४. मौजे दारूंब्रे ते सांगवडे प्रजिमा १०५ रस्ता काँक्रीटीकरण करणे – ११ कोटी
५. मौजे उर्से ते आढे ते सडवली करणे प्रजिमा २२८ रस्ता काँक्रीटीकरण करणे – १ कोटी ४४ लक्ष
६. मौजे आढले गाव ते घारगिल माथा ते डोणे फाटा दिवड फाटा गाव इजिमा ६६ रस्ता काँक्रीटीकरण करणे – १३ कोटी २० लक्ष
७. मौजे सडवली शिवणे डोणे प्रजिमा २३० रस्ता काँक्रीटीकरण करणे – २२ कोटी ५० लक्ष

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लोणावळा शहरात अतिमुसळधार पाऊस, 24 तासांत विक्रमी 432 मिलिमीटर पावसाची नोंद; आज शाळा, कॉलेजेस बंद । Lonavala Rain
– आनंदाची बातमी ! पवना धरण 100 टक्के भरले, धरणाचे सहाही दरवाजे उघडले, 5720 क्युसेक विसर्ग सुरू । Pawana Dam Updates
– छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश; शिवसेना खासदारांकडून पंतप्रधानांचे आभार

 
			






