Dainik Maval News : मावळ तालुक्यातील गोडुंबरे फाटा येथे एका २८ वर्षीय तरूणाला बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे गावठी पिस्तूल बाळगताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. खंडु अशोक कालेकर (वय २८ वर्षे, रा. पवनानगर, कालेकॉलनी ता. मावळ जि. पुणे) असे आरोपीचे नाव असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सोमवारी (दि. ८ ) शिरगाव ते कासारसाई रोडवर गोडुंबरे फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. पोलीस शिपाई सागर बाळासो जैनक यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महा. पो.का.क. ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खंडू कालेकर हा शिरगाव ते कासारसाई रोडवरील गोडुंबरे फाटा येथे ४०,००० रुपये किमतीचे १ देशी बनावटीचे गावठी पिस्टल आणि १००० रुपये किमतीचे १ जिवंत काडतुस (पितळी राऊंड) बेकायदेशीररित्या स्वतःजवळ बाळगताना मिळून आला आहे. पुढील तपास शिरगाव पोलिसचे पोउपनि पारखे हे करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराची अखेरच्या दिवशी माघार
– लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिवेशनात मोठी घोषणा
– इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा खंडीत होण्याचा मावळातील फूल उत्पादकांना फटका ; कोट्यवधीचे नुकसान
– नगराध्यक्षाचं जनता ठरवेल, पण उपनगराध्यक्षाचं बोला ! उमेदवारांकडून उपनगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात


