व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, May 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! कामशेतजवळील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 10 जण ताब्यात, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त । Maval Crime News

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकारल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 18, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Crime

File Photo : Crime


लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकारल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे खडकाळे येथे नाणे रेल्वे गेट जवळील एका बंदीस्त खोलीमध्ये काहीजण अवैधरित्या जुगार अड्डा चालवत आहेत आणि त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर व नागरिकांवर वाईट परिणाम होत आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी रविवारी (दि. 18) रोजी त्यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले. तेव्हा मौजे खडकाळे मधील नाणे रेल्वे गेट जवळील एका बंदीस्त खोलीमध्ये पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये जुगार अड्डा चालवणारा एजंट व जुगार खेळणारे असे एकूण 10 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. (Police raid illegal gambling den near Kamshet 10 people detained valuables worth 11 lakhs seized)

त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, गाड्या व मोबाईल फोन असा एकूण 11,43,470 रूप्ये (अक्षरी अकरा लाख त्रेचाळीस हजार चारशे सत्तर) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत पो.कॉ रहिस मुलाणी यांनी दिलेल्या फिर्यादिवरून कामशेत पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये वर नमूद 10 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कामशेत पोलीस स्टेशन चे पोसई शुभम चव्हाण करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोहवा नितेश (बंटी) कवडे, पो.कॉ रहिस मुलाणी यांचे पथकाने केली आहे.

अधिक वाचा –
– धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव समारंभ उत्साहात; वन्यजीव रक्षक निलेश गराडे यांना कर्तव्यनिष्ठ पुरस्कार । Talegaon Dabhade
– मावळ तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक : 19 पैकी 10 जागा बिनविरोध, 9 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात । Maval Taluka Kharedi Vikri Sangh
– पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक, ‘या’ लोकल गाड्या रद्द, पाहा वेळापत्रक । Mega Block on Pune Lonavala Railway Route 


Previous Post

खासदार श्रीरंग बारणे यांचे दातृत्व, तरुणाला किडनी ट्रान्सफरसाठी केली एक लाखाची मदत । Maval Lok Sabha

Next Post

मावळात खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीतून दिसणार महायुतीची ताकद! 19 पैकी 10 जागा आधीच बिनविरोध । Maval Taluka Kharedi Vikri Sangh

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-taluka-kharedi-vikri-sangh-election

मावळात खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीतून दिसणार महायुतीची ताकद! 19 पैकी 10 जागा आधीच बिनविरोध । Maval Taluka Kharedi Vikri Sangh

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

house of widow Shalan Dahibhate in Bedse Maval was gutted in fire caused by short circuit

एक वर्षापूर्वी पतीचे निधन, आता आगीत घर जळून खाक ; बेडसे गावातील शालन दहिभाते यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

May 20, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

पुणे-मुंबई महामार्गालगत वेश्या व्यवसाय तेजीत ! तळेगाव, वडगाव, देहूरोड, सोमाटणे हद्दीत अनेक अड्डे ; पोलिसांचे पाहूनही दुर्लक्ष

May 20, 2026
ECI Central Election Commission

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू

May 19, 2026
fadnvis shinde pawar

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता

May 19, 2026
Pune District Collector Jitendra Dudi

पुणे जिल्ह्यात धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

May 19, 2026
आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

May 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.