Dainik Maval News : पोलिसांनी वारंवार कारवाया करून देखील शिरगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या गावठी दारू अड्डे काही केल्या कमी होताना किंवा कायमचे बंद होताना दिसत नाही. नुकतीच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने शिरगाव पोलिस ठाणे हद्दीतील आणखीन एक गावठी हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त केला. यामध्ये एका तीस वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि. २) सायंकाळी पाऊणेसहाच्या सुमारास शिरगाव ठाणेहद्दीत पवना नदीकाठी ही कारवाई करण्यात आली. पोलीस शिपाई संदीप शंकर सुखदाने यांनी याप्रकरणी शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पातालसिंग हेमराज राजपुज (वय ३० वर्षे, रा कांजरभटवस्ती, शिरगाव) याच्यावर महाराष्ट्र दाबंदी अधिनियम कलम ६५ ( क ) (फ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या कब्जात हातभट्टी दारू तयार करण्यासाठी १ लाख ७२ हजार प्रमाणे किंमतीचे ३३०० लीटर गुळ मिश्रीत रसायन भिजत घालतांना आणि ७० लीटर गावठी हातभटटी तयार दारु तयार करताना आणि दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य बाळगताना मिळून आला आहे. आरोपी अटकेत नसून सपोफौ काळे हे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा समिती सभापतीपदी सुनील ढोरे ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून घोषणा
– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन ; भारतीय हवाई दलात पायलट ते केंद्रीय मंत्री, अशी होती कलमाडी यांची कारकीर्द
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे २३ जानेवारीपासून भव्य गाथा व ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन ; कार्यक्रमाची जोरदार तयारी