Dainik Maval News : शिरगाव – परंदवडी पोलीस ठाणे हद्दीत शिरगावमध्ये पवना नदीकाठच्या हातभट्टीच्या दारूअड्ड्यावर पोलिसांना छापा मारून कारवाई केली. हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या महिलेच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली.
मंगळवारी (दि. १७) दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शिरगाव धामणे येथील २८ वर्षीय महिलेच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाातील पोलीस हवालदार गणेश सिताराम कारोटे यांनी याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतरा जून रोजी आरोपीकडून ७० लिटर तयार दारू व तीन हजार लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन जप्त करण्यात आले. एकूण साठ्याची किंमत सुमारे एक लाख ५० हजार रुपये आहे. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल – लगेच चेक करा
– धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश
– PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात
– तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar