राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु असून याअंतर्गत 147 बाजार समित्यांचे मतदान 28 एप्रिल तर 88 बाजार समित्यांचे मतदान 30 एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी दिली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राधिकरणाने 21 मार्चच्या आदेशानुसार 253 कृषि उत्पन्न बाजार समित्याची निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. त्यातील 18 बाजार समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित 235 बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे. ( Polling on April 28th and 30th for elections to Agricultural Produce Market Committees in Maharashtra )
या निवडणुकीअंतर्गत एकूण 4 हजार 590 जागा निवडून द्यायच्या होत्या. त्यापैकी सहकारी संस्थांच्या मतदार संघामध्ये 2 हजार 805 पदांपैकी 18 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित जागांसाठी 6 हजार 230 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ग्रामपंचायतींच्या मतदार संघात 1 हजार 20 पदांपैकी 21 जागा बिनविरोध झाल्या असून 2 हजार 457 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. व्यापारी/अडते मतदार संघात 510 पदांपैकी 49 बिनविरोध तर उर्वरित जागांसाठी 1 हजार 52 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हमाल/मापारी मतदार संघामध्ये 255 पदांपैकी 64 जागा बिनविरोध झाल्या असून 606 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
28 एप्रिल रोजी मतदान होणाऱ्या 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी 28 एप्रिल रोजी, 95 समित्यांची मतमोजणी 29 एप्रिल रोजी तर 15 समित्यांची मतमोजणी 1 मे रोजी होणार आहे. 88 पैकी 78 समित्यांची मतमोजणी 30 एप्रिल रोजी तर 10 समित्यांची मतमोजणी 1 मे रोजी होणार आहे, असेही डॉ. खंडागळे यांनी सांगितले आहे.
अधिक वाचा –
– ‘कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी’, तळेगाव शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याचा निर्धार
– आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळातील 39 आदिवासी बांधवांना मोफत जातीचे दाखले वाटप