माळवाडी ग्रामपंचायतच्या (ता. मावळ) उपसरपंच पदी पूजा मयुर दाभाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पल्लवी रोहिदास मराठे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी पूजा मयुर दाभाडे यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. त्यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र आल्याने पूजा दाभाडे यांची ग्रामपंचायत माळवाडी उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अध्यासी अधिकारी पल्लवी संदीप दाभाडे (सरपंच) यांनी निवड जाहीर केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
याप्रसंगी माजी सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. तसेच माळवाडी गावातील जेष्ठ कार्यकर्ते गोरख दाभाडे, बाळासाहेब ना दाभाडे,बजरंग जाधव,संजय माळी,भिमाजी दाभाडे, बाळासाहेब म दाभाडे,अशोक दाभाडे, नामदेव दाभाडे,बबन आल्हाट,सुरेश शिंदे,मारुती शेलार,छगन दाभाडे, सुदाम माळी,अशोक कि दाभाडे, बाळासाहेब रा दाभाडे,धनंजय दाभाडे,दिलीप दाभाडे,गणेश दाभाडे,रोहिदास मराठे,बाळासाहेब भोंगाडे, दत्तात्रय कु दाभाडे, पंढरीनाथ दाभाडे, रोहिदास म्हसे,संपत दाभाडे, संतोष दाभाडे,ॲड सुधीर भोंगाडे, महेंद्र जायगुडे आधी उपस्थित होते तसेच गावातील माता भगिनीं, युवक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. (Pooja Mayur Dabhade Elected Unopposed Deputy Sarpanch of Malwadi Gram Panchayat)
“सहकार महर्षी माऊली भाऊ दाभाडे आणि आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना बरोबर घेऊन गावात विविध विकासकामे करणार आहे.” – नवनिर्वाचित उपसरपंच, पूजा मयुर दाभाडे.
अधिक वाचा –
– ‘या’ वर्षापुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना ‘घरातून मतदान’ उपक्रमाद्वारे मतदानाची सुविधा देणार – मुख्य निवडणूक अधिकारी
– कशाळ येथील साकव पुलाचे ग्रामस्थांच्या हस्ते भूमिपूजन; 42 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार शेळकेंचे मानले आभार
– मावळ तालुक्यात राष्ट्रवादी अजितदादा गटाला मोठा झटका! जुन्या जाणत्या नेत्याचा पक्षाला राम-राम… अनेक गंभीर आरोप