Dinik Maval News : कार्ला, दि.५ (वार्ताहर) – एकविरा देवी मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या वेहरगाव दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुजा अशोक पडवळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळत्या सरपंच वर्षा मावकर यांनी पदाचा ठरविलेला कार्यकाल पूर्ण झाल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त पदासाठी कार्ला मंडल अधिकारी आशा धायगुडे यांंच्या मार्गदर्शनाखाली विशेष सभा बोलावून सरपंच पदाची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी सरपंच पदासाठी विहित मुदतेत पुजा अशोक पडवळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आशा धायगुडे, तर सहाय्यक अधिकारी म्हणून ग्रामसेवक गणेश आंबेकर यांनी काम पाहिले. यावेळी मावळत्या सरपंच वर्षा मावकर, उपसरपंच शंकर बोरकर, माजी उपसरपंच काजल पडवळ, ग्रामपंतायत सदस्य राजू देवकर, सुनिल येवले, अनिल गायकवाड, योगिता पडवळ उपस्थित होते. सरपंचपदी निवड झाल्यानंतर पुजा पडवळ यांचा सर्वांच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला. ( Pooja Padwal Elected Sarpanch of Vehargaon Dahivali Group Gram Panchayat Karla Maval )
यावेळी रविंद्र भेगडे, शरद हुलावळे, सुरेश गायकवाड, सायली बोत्रे, जितेंद्र बोत्रे, गणपत पडवळ, सचिन येवले, दत्तात्रय पडवळ, चंद्रकांत देवकर, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर पडवळ, शरद कुटे, मंगेश हुलावळे, अशोक पडवळ, मोरेश्वर पडवळ, नवनाथ पडवळ, चंद्रकांत शेलार, माऊली बोत्रे, दिनेश पडवळ, भगवान बोरकर, योगेश पडवळ यांंच्यासह वेहरगाव दहिवली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पवना धरणातून विसर्ग वाढविल्याने पवना नदीची पाणीपातळी वाढली, कोथूर्णे गावचा पूल पाण्याखाली
– मावळ तालुक्यातील ‘या’ दोन शाळांचा ‘लोकमान्य टिळक आदर्श शाळा’ पुरस्कार देऊन गौरव । Maval News
– महत्वाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन संकेतस्थळ सुरू, आता पटकन करता येणार अर्ज, पाहा वेबसाईट