सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलात पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य कुस्तीगीर परिषद आणि सांगली जिल्हा तालीम संघातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात सांगली जिल्ह्यातील तुंग गावची प्रतीक्षा बागडी हिने अंतिम सामन्यात बाजी मारत पहिली महिला महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावे केला आहे. प्रतीक्षा ने अंतिम सामन्यात कल्याण च्या वैष्णवी पाटील हिचा 4 विरुध्द 10 गुणांनी पराभव केला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सकाळी झालेल्या उपांत्य सामन्यात बागडी हिने कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिचा 9 विरूध्द 2 गुणांनी पराभव करीत अंतिम लढतीत प्रवेश केला होता. तर, दुसर्या कुस्तीमध्ये वैष्णवी पाटीलने वैष्णवी कुशाप्पाचा 11 विरूध्द 1 अशा गुंणांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. ( Pratiksha Bagdi from Sangli has made history by becoming the first female wrestler to win the Maharashtra Kesari title )
१ ली महिला महाराष्ट्र केसरी – सांगली २०२२ प्रतीक्षा बागडी ( सांगली )
हार्दिक अभिनंदन
प्रा बाळासाहेब लांडगे
सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद pic.twitter.com/LTEPwdWfFJ— Maharashtra State Wrestling Association म.रा.कु.प. (@StateMswa) March 24, 2023
माझ्या मतदारसंघातील तुंग येथील महिला कुस्तीपटू पै. प्रतिक्षा रामदास बागडी यांनी आज कल्याणच्या पै. वैष्णवी पाटील यांना चितपट करीत पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावला. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ????#MaharashtraKesari #sangli #महाराष्ट्र_केसरी pic.twitter.com/gYms59wQZV
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 24, 2023
पहिल्यांदाच आयोजित केल्या गेलेल्या महिला महाराष्ट्र केसही स्पर्धेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण 450 कुस्तीपटू महिला महाराष्ट्र केसरी बनण्याचे स्वप्न घेऊन सांगलीत दाखल झाल्या होत्या. पण मानाची गदा आणि किताब जिंकण्याचा मान प्रतीक्षाला तिच्या मेहनतीच्या जोरावर मिळाला. गुरुवारी (23 मार्च) हिंदकेसरी दीनानाथ सिंग यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. शुक्रवारी (24 मार्च) स्पर्धेची अंतिम लढत पार पडली.
अधिक वाचा –
– देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! राहुल गांधी यांची लोकसभेची खासदारकी रद्द
– तृषार्थ वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी शिरोता वनविभागात 30 वॉटर होल, वनविभागाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक