व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! सांगलीतील तुंग गावच्या प्रतीक्षा बागडीने पटकावला पहिला ‘महिला महाराष्ट्र केसरी’ किताब, पोलीस पित्याचे स्वप्न साकार

सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलात पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य कुस्तीगीर परिषद आणि सांगली जिल्हा तालीम संघातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 24, 2023
in महाराष्ट्र, मावळकट्टा
Pratiksha-Bagdi-from-Sangli

Photo : Twitter


सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलात पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य कुस्तीगीर परिषद आणि सांगली जिल्हा तालीम संघातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात सांगली जिल्ह्यातील तुंग गावची प्रतीक्षा बागडी हिने अंतिम सामन्यात बाजी मारत पहिली महिला महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावे केला आहे. प्रतीक्षा ने अंतिम सामन्यात कल्याण च्या वैष्णवी पाटील हिचा 4 विरुध्द 10 गुणांनी पराभव केला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सकाळी झालेल्या उपांत्य सामन्यात बागडी हिने कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिचा 9 विरूध्द 2 गुणांनी पराभव करीत अंतिम लढतीत प्रवेश केला होता. तर, दुसर्‍या कुस्तीमध्ये वैष्णवी पाटीलने वैष्णवी कुशाप्पाचा 11 विरूध्द 1 अशा गुंणांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. ( Pratiksha Bagdi from Sangli has made history by becoming the first female wrestler to win the Maharashtra Kesari title )

१ ली महिला महाराष्ट्र केसरी – सांगली २०२२ प्रतीक्षा बागडी ( सांगली )

हार्दिक अभिनंदन
प्रा बाळासाहेब लांडगे
सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद pic.twitter.com/LTEPwdWfFJ

— Maharashtra State Wrestling Association म.रा.कु.प. (@StateMswa) March 24, 2023

माझ्या मतदारसंघातील तुंग येथील महिला कुस्तीपटू पै. प्रतिक्षा रामदास बागडी यांनी आज कल्याणच्या पै. वैष्णवी पाटील यांना चितपट करीत पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावला. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ????#MaharashtraKesari #sangli #महाराष्ट्र_केसरी pic.twitter.com/gYms59wQZV

— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 24, 2023

पहिल्यांदाच आयोजित केल्या गेलेल्या महिला महाराष्ट्र केसही स्पर्धेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण 450 कुस्तीपटू महिला महाराष्ट्र केसरी बनण्याचे स्वप्न घेऊन सांगलीत दाखल झाल्या होत्या. पण मानाची गदा आणि किताब जिंकण्याचा मान प्रतीक्षाला तिच्या मेहनतीच्या जोरावर मिळाला. गुरुवारी (23 मार्च) हिंदकेसरी दीनानाथ सिंग यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. शुक्रवारी (24 मार्च) स्पर्धेची अंतिम लढत पार पडली.

अधिक वाचा –

– देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! राहुल गांधी यांची लोकसभेची खासदारकी रद्द
– तृषार्थ वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी शिरोता वनविभागात 30 वॉटर होल, वनविभागाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील नोंदणीकृत महिला स्वयंसहायता समुहातील महिलांसाठी कामशेतमध्ये व्यवसायिक कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न

Next Post

महत्वाची बातमी! आता टोल प्लाझावर टोल द्यावा लागणार नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितला मास्टर प्लान

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Toll-Plaza-Maval

महत्वाची बातमी! आता टोल प्लाझावर टोल द्यावा लागणार नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितला मास्टर प्लान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.