Dainik Maval News : आजपासून (दिनांक 21 फेब्रुवारी) राज्यभरात महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावी बोर्ड परीक्षेला सुरूवात होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील ही परीक्षा म्हणजे एक महत्वाचा टप्पा आहे. मावळ तालुक्यातील पवनानगर केंद्रातही दहावीच्या परीक्षेची तयारी पुर्ण झाली असल्याची माहीती केंद्रसंचालक व प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी दिली.
पवनमावळ परिसरातील पवना विद्या मंदिर, पवनानगर केंद्रामध्ये पवना विद्या मंदिर, वारु-कोथुर्णे विद्यालय कोथुर्णे,भैरवनाथ विद्यालय बौर,संत तुकाराम विद्यालय शिवणे,संत ज्ञानेश्वर विद्यालय दिवड,श्री छत्रपती शिवाजी विद्यालय शिवली,माध्यमिक विद्यालय करुंज,ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय जवण अजिवली या शाळेतील विद्यार्थी या शाळांमधील एकूण 417 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत.
- यंदा परीक्षा ‘कॉपी मुक्त अभियाना ‘साठी व परिक्षा शांततेत पार पाडण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवाण्यात आला असुन दक्षता समितीचे सदस्यही मदत करत आहेत. तसेच केंद्र कॉफी मुक्त होण्यासाठी संपूर्ण ब्लॉक मध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
नूतन महाराष्ट्र प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी केंद्रातील विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही परीक्षा व्यवस्थितरित्या पार पडावी व विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी परीक्षा केंद्रसंचालक भाऊसाहेब आगळमे, उपकेंद्र संचालिका अर्चना शेडगे, परीक्षा विभाग प्रमुख भारत काळे, सहाय्यक गणेश ठोंबरे विशेष प्रयत्न करत आहेत.
यावेळी बोलताना भाऊसाहेब आगळमे म्हणाले की, केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त असून सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी भयमूक्त वातावरण परीक्षा देऊ शकतील. परिसरातील आठ शाळांतील विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देणार असून विद्यार्थ्यांना वर्षभर मेहनत घेऊन अभ्यास केलेला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश