उद्या अर्थात बुधवार, दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रोपती मुर्मू या लोणावळा येथील कैवल्यधाम योगा केंद्राला भेट देणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन करणार आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या या दौ-या निमित्त प्रशासन सज्ज झाले असून पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी लोणावळा विभाग आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी ही माहिती दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राष्ट्रपती महोदया आयएनएस शिवाजी ते कैवल्यधाम योगा केंद्र नियोजित कार्यकमासाठी जाणार असून, सुरक्षेच्या उपायोजना म्हणून पोलीस प्रशासनाकडून आयएनएस शिवाजी ते कैवल्यधाम या मार्गावरील वाहतूक राष्ट्रपती महोदयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील वाहतुकीमध्ये व्यवस्थापनाच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 अन्वये बंदोबस्ताचे मुख्यमार्गावरील वाहतूक दिनांक 29/11/2023 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 वा यावेळेत अंशत: निर्बंध घालण्यात येत आहे. सदर बाबत पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश पारीत करण्यात आले आहेत. ( President Draupathi Murmu Lonavala Pune Visit Important Notes About Changes In Transportation )
पर्यायी मार्ग :
– पुणे बाजुकडून एक्सप्रेस वे वरुन येणारी वाहने ही लोणावळा येथे न येता एक्सप्रेस वे ने मुंबई कडे जातील तसेच पुणे कडून जुन्या हायवे ने येणारी वाहने ही कुसगाव टोलनाका येथून एक्सप्रेस वे ने मुंबई बाजुकडे जातील.
– मुंबई बाजुकडून एक्सप्रेस वे ने येणारी वाहतूक ही खंडाळा एक्झीट येथून खाली न उतरता पुणे बाजुकडे सरळ जातील. तसेच लोणावळा एक्झीट ने खाली येवून पुणे बाजुकडे जातील.
– लोणावळा शहरातील वाहन धारकांनी सदर वेळेत आपली वाहने शक्यतो आणू नये.
– ड्रोन, पॅराग्लायडींग तसेच एअर बलून असे लोणावळा शहर व परीसरात उड्डाणास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ बातमी अगोदर वाचा
– ‘टेंट व्यवसाय अधिकृत करण्यासाठी प्रयत्न सुरु’, बाळा भेगडेंनी घेतली पवना टेंट व्यावसायिकांची भेट
– भाजे गावातील ‘त्या’ चोरीचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 2 तासात लावला छडा, आरोपी अटकेत