कालभैरव जयंती कार्तिक उत्सवानिमित्ताने वडगाव मावळमध्ये कैवल्याचा पुतळा (संत ज्ञानेश्वर महाराज कथा, ज्ञानामृत सोहळा) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री पोटोबा देवस्थान संस्थानकडून या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यात कथा प्रवक्ते वाणीभूषण ह.भ.प. गणेश महाराज वाघमारे हे निरूपण करणार आहेत.
श्री पोटोबा, महादेव, मारुती, दत्त देवस्थान संस्थान, वडगाव मावळ यांचे वतीने बुधवार दिनांक 9 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये कैवल्याचा पुतळा, संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा, या ज्ञानामृत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात कथा प्रवक्ते वाणीभूषण हभप गणेश महाराज वाघमारे (ओतूर, जुन्नर) हे कथेचे निरूपण करणार आहेत. ( Program In Potoba Maharaj Mandir Vadgaon Maval On Occasion Of Kalbhairav Jayanti Kartik Festival )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
एकूण 9 दिवसीय कार्यक्रमामध्ये दररोज पहाटे 5 वाजता अभिषेक, महापूजा, आरती आणि सायंकाळी 7 ते 9 संत ज्ञानेश्वर महाराज कथा संपन्न होणार आहे. बुधवार 16 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते 12 कालभैरवनाथ जयंती निमित्त देवजन्माचे कीर्तन होणार असून गुरुवारी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 12 काल्याचे कीर्तन हभप गणेश महाराज वाघमारे यांचे होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
सदर कार्यक्रमाचे नियोजन देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त गणेशाआप्पा ढोरे, अनंता कुडे, किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ऍड अशोकराव ढमाले, ऍड तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे आदीसह ग्रामस्थ करणार आहेत.
अधिक वाचा –
– पवनानगरमधील साम्राज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भाऊ मोरे यांचे दुःखद निधन, मित्रपरिवार शोकसागरात
– ‘राजकारणातला गद्दार…अब्दुल सत्तार’, मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कवितेचा व्हिडिओ व्हायरल
View this post on Instagram