व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 2, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेशबंदी करा, दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करा ; खासदार श्रीरंग बारणेंचे पत्र

वर्षाविहाराच्या वेळी होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंदी करावी.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 2, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


वर्षाविहाराच्या वेळी होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंदी करावी, अशी सूचना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. खासदार बारणे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व मावळचे तहसीलदार यांना या संदर्भात पत्र दिले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्यात एकाच कुटुंबातील पाचजण वाहून जाण्याची दुर्घटना मन हेलावणारी आहे. अशा पद्धतीच्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने तातडीने काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे बारणे यांनी पत्रात म्हटले आहे. ( Prohibit entry of tourists to dangerous places Letter from Maval MP Shrirang Barane )

पर्यटकांची गर्दी होत असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच सुरक्षा विषयक सूचनांचे फलक लावण्यात यावेत. अतिउत्साही पर्यटकांना नियंत्रित करण्यासाठी आवश्यक तेवढे अतिरिक्त पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत. धोकादायक ठिकाणी पर्यटकांसाठी प्रवेश बंदी लागू करण्यात यावी. पर्यटकांची गर्दी असलेल्या ठिकाणी पावसाळ्यात जीवरक्षकांची नेमणूक करण्यात यावी. त्यामुळे दुर्घटनेच्या वेळी पर्यटकांना तातडीने मदत मिळू शकेल, अशा सूचना बारणे यांनी केले आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघातील लोणावळा, खंडाळा तसेच मावळ तालुक्यातील डोंगराळ भागात पावसाळ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होते. पावसाळ्यामुळे डोंगरांवरून खाली झेपावणारे पांढरे शुभ्र धबधबे, खळखळून वाहणाऱ्या नद्या आणि तुडुंब भरलेले जलाशय पर्यटकांना खुणावत असतात. मात्र काही अतिउत्साही पर्यटक त्यांच्या सुरक्षिततेबाबत पुरेशी खबरदारी घेत नसल्यामुळे गंभीर दुर्घटना घडत आहेत, असे बारणे यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा –
– फौजदारी कायद्यांमधील बदलांबाबत कामशेत पोलिसांकडून जनजागृती, नेमके काय बदल झालेत? वाचा एका क्लिकवर । Kamshet News
– लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क ! थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून नवे आदेश जारी, पर्यटनाबाबत सविस्तर नियमावली जाहीर
– भुशी डॅम दुर्घटना : रेस्कू ऑपरेशन पूर्ण, पाचही शव शोधण्यात आपदा मित्रांना यश, प्रतिकुल परिस्थितीत केलं शोधकार्य


Previous Post

वडगाव मावळ येथील प्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव यांना राज्यस्तरीय ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’ । Vadgaon Maval

Next Post

मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Anil Parab

मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dehugaon Lonar community felicitates meritorious students Dehu News

देहूगाव : लोणारी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न । Dehu News

July 2, 2025
Video of elderly farmer grandparents working in the fields in Latur district

VIDEO : कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल… लातूर जिल्ह्यातील वृद्ध शेतकरी आजीआजोबांचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ

July 2, 2025
mns raj thackeray

लोणावळ्यात मनसेची धडाकेबाज कामगिरी ! ‘फी’साठी विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या शाळेला दणका । Lonavala News

July 2, 2025
Sachin Thakar elected as president of Maval Taluka Rural Journalists Association Vishal Kumbhar as vice-president

मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन ठाकर, उपाध्यक्षपदी विशाल कुंभार यांची निवड – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

July 1, 2025
Last rites of former Maval MLA Krishnarao Bhegde

माजी आमदार कृष्णराव भेगडे पंचतत्वात विलीन ! जनसामान्यांच्या असामान्य नेतृत्वास साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

July 1, 2025
DCM Ajit Pawar pays emotional tribute to former Maval MLA Krishnarao Bhegde

मावळ, पुण्याच्या विकासासाठी समर्पित नेतृत्वं हरपलं ! अजित पवारांकडून कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण

July 1, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.