हॅण्ड इन हॅण्ड इंडिया , तळेगाव (दाभाडे), आणि सहासंखा (CSR) प्रकल्पाअंतर्गत यांच्यामार्फत शासकीय सामजिक सुरक्षा योजना जनजागृती कार्यक्रम मावळ तालुक्यामधील दुधिवरे गावामध्ये घेण्यात आला.
शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमाचा उद्देश हा ग्रामीण भागातील गरजू लोकांना केंद्र व राज्य शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत जन जागृती करून लाभार्थ्यांपर्यंत आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज करण्याचे सरकारी ठिकाण या गोष्टींची जाणीव आणि पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास सदर कार्यक्रमामार्फत प्रयत्न करणे, हा आहे. ( Public Awareness Program About Government Schemes By Hand in Hand India NGO In Dudhivare Village Of Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमास परमेश्वर कांबळे आणि यशोदा कालेकर यांनी शासकीय योजनेबद्दल माहिती दिली. यावेळी दुधिवरे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाअंतर्गत लोकांना ई-श्रम कार्ड आणि आभा कार्ड काढून देण्यात आले.
हेही वाचा – मावळ तालुक्यातील अतिदुर्गम तुंग गावात डिजीटल साक्षरता प्रशिक्षण शिबिर
शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेकडून परमेश्वर कांबळे, मोहन सोनवणे, यशोदा कालेकर आणि मलिका अन्सारी इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. मलिका अन्सारी यांनी शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमास सहभागी ग्रामस्थांचे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व संस्थेचे यांचे आभार मानले. ( Public Awareness Program About Government Schemes By Hand in Hand India NGO In Dudhivare Village Of Maval Taluka )
अधिक वाचा –
– माजी मंत्री बाळा भेगडे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड; पाहा नवनियुक्त 20 सदस्यांची संपूर्ण यादी
– मोठी बातमी! वंचित बहुजन महिला आघाडीची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी सारिका सिंग, पाहा संपूर्ण यादी