हॅण्ड इन हॅण्ड इंडिया, तळेगाव (दाभाडे), सहासंखा यांच्या मार्फत केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सामाजिक सुरक्षा योजना व इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्स याविषयी जाणीव जागृती, तसेच शेवगा झाडाचे रोपे वाटप कार्यक्रम दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी पाटण (तालुका – मावळ, जिल्हा -पुणे) येथे आयोजित करण्यात आला. ( public awareness program regarding government schemes in patan village 160 women attended workshop )
सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमाचा उद्देश हा, ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबिवल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत पुरेशी जाणीव जागृती नसल्यामुळे, योजना पात्र लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रमामार्फत पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.
पाटण गावातील सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना, ई – श्रम कार्ड, सुकन्या समृध्दी योजना, इत्यादी विविध योजनांची माहिती महिलांना देण्यात आली तसेच शेवगा झाडाचे 150 रोप वाटप करण्यात आले. सदर सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमामध्ये पाटण गावातील 160 महिलांनी उपस्थिती नोंदवली.
सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्था प्रतिनिधी मुख्य महाव्यवस्थापक चेन्नई, मोसेस सॅम्युअल, मुख्य व्यवस्थापक महाराष्ट्र, अनिल पिसाळ , महाराष्ट्र राज्य समन्वयक, परमेश्वर ज. कांबळे, क्षेत्रीय समन्वयक, सारिका शिंदे, ब्लॉक ट्रेनर, रत्ना आंबेकर इत्यादी उपस्थित होते. संस्थेकडून महाराष्ट्र राज्य समन्वयक परमेश्वर ज. कांबळे यांनी उपस्थित मान्यवर आणि महिलांचे आभार मानले. ( public awareness program regarding government schemes in patan village 160 women attended workshop )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– …अन् दारुंब्रे शाळेच्या भिंती लागल्या बोलू, आमदार सुनिल शेळकेंकडून तोंडभरुन कौतूक
– स्वातंत्र्यदिनी नवजीवन! राज्यातील विविध कारागृहांमधून तब्बल 186 कैद्यांची सुटका, जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन
– फोर व्हीलरला फॅन्सी नंबर पाहिजे? आरटीओकडून लवकरच नवीन मालिका, अशी करा नोंदणी