Dainik Maval News : आपण नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याच्या भूमिकेतूनच काम करतो. आपण कधीच फक्त भावकीचा विचार केला नाही. आपण गावकीचा विचार करून तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला, असे मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप-शिवसेना-आरपीआय- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार सुनील शेळके पवनानगर, शेवती वसाहत, कडधे, ओझर्डे, राऊतवाडी, बौर या गावांचा जनसंवाद दौरा केला. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला अध्यक्ष दीपाली गराडे तसेच ज्येष्ठ नेते गणेशअप्पा ढोरे, विठ्ठल शिंदे,पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, आदी पदाधिकारी होते.
पवन मावळात ठिकठिकाणी आमदार शेळके यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ढोल-ताशा व डीजेच्या दणदणाटात रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची उधळण आणि औक्षण करीत सर्व ग्रामस्थांनी शेळके यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
ओझर्डे गावात सव्वादोन कोटींची विकास कामे
ओझर्डे गावाला आमदार शेळके यांनी सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा निधी दिल्याचे धनंजय ओझरकर यांनी सांगितले. या व्यतिरिक्त खडी आणि दोन लाख रुपयांची वैयक्तिक मदत केली. सुनीलअण्णांमुळे गावाच्या विकासाला गती मिळाली, असे ते म्हणाले.ओझर्डे गावात संदीप शेळके, भरत भोपे, विष्णू मुऱ्हे आदी पदाधिकारीही उपस्थित होते.
मावळच्या विकासाचे मॉडेल जगासाठी पथदर्शक
बौर गावात बाळू मोहोळ म्हणाले की,”मावळच्या विकासाचे मॉडेल संपूर्ण जगासाठी पथदर्शक आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य माणूस आमदारांच्या मागे आहे. त्यामुळे ते नक्कीच बहुमताने निवडून येतील हा विश्वास आहे. त्यासाठी सर्वांनी एक नंबरचे बटन दाबून त्यांना निवडून आणावे.“
संदीप खिरिड म्हणले की,”बौर गावाला मोठा विकास निधी दिल्याबद्दल मी आमदारांचे आभार मानतो, बौर गावातील तरुणांना न्याय फक्त तुम्हीच देऊ शकता, हीच आशा आहे म्हणून तुम्हाला आमचा पाठिंबा आहे”
राऊतवाडीत १० कोटींचा विकास निधी
राऊतवाडीतही आमदार शेळके यांचे जोरदार स्वागत झाले. त्यावेळी माजी सरपंच पोपटराव राऊत तसेच नामदेव राऊत, काळुराम राऊत, सोपान करके, भगवान लगड, शंकर लगड, आदेश लगड आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. गावातील विकासकामांसाठी आमदारांनी १० कोटी रुपयांचा निधी दिला. २० लाख रुपये देऊन गावातील मंदिराचे काम पूर्ण केले. आमदारांनी कोणताही भेदभाव न करता सर्वांना मदत केली आहे,” असे आदेश लगड म्हणाले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– काँक्रीटीकरण व रुंदीकरणामुळे वडगाव मावळची बाजारपेठ झाली सुसज्ज ! Vadgaon Maval
– पवन मावळ विभागातून बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचार बैठकांना उदंड प्रतिसाद । Bapu Bhegade
– पवनानगर येथील विजयी संकल्प मेळाव्यात सुनिल शेळके यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार ; नागरिकांची तोबा गर्दी