व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनानगर येथील विजयी संकल्प मेळाव्यात सुनिल शेळके यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार ; नागरिकांची तोबा गर्दी

मावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुनील शेळके यांचा पवन मावळ पश्चिम विभागाचा विजयी संकल्प मेळावा पवनानगर येथे झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 5, 2024
in ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Vidhan Sabha candidate Sunil Shelke is determined to get record number of votes

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : समोरच्या उमेदवाराला कोणत्याही पक्षाचा अधिकृत पाठिंबा निश्चित नाही, नंबर नाही, व्हिजन नाही, अजेंडा नाही, फक्त सुनील शेळकेला विरोध एवढाच त्यांचा अजेंडा आहे. उगाच दम देत लोकांना दमदाटीचे फोन करायचे. रात्री अपरात्री २-३ वाजता घरी जायचे. सोशल मीडिया वरील स्टेटस डिलीट करा, कॉमेंट करू नको, नाहीतर आमच्याशी गाठ आहे, हे विसरू नका, अशी धमकी द्यायची. मावळची जनता ही दहशत सहन करणार नाही,. असे आमदार सुनिल शेळके म्हणाले.

Novel NIBR Ads

मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुनील शेळके यांचा पवन मावळ पश्चिम विभागाचा विजयी संकल्प मेळावा पवनानगर येथे झाला. यावेळी आमदार शेळके बोलत होते.

व्यासपीठावर आमदार सुनिल शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा दीपाली गराडे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश ढोरे, सरपंच खंडूअण्णा कालेकर तसेच सुरेखा काळे, दादासाहेब वाघमारे आदी पदाधिकारी, महायुतीचे कार्यकर्ते व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पुढे बोलताना आमदार शेळके म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली मुलाखत बघा. ते सुद्धा बोलले की ‘त्यांचे व्यक्तिगत वैर आहे’ म्हणून मी विनंती करतो की, हे असा दादागिरी, भाईगिरी, खुनशीचे राजकारण करू नका, आता मावळची जनता ऐकून घेणार नाही, असे शेळके म्हणाले. माझ्या आई- बहिणींनी कधी हॉटेल पहिले नव्हते, समुद्र किनारा पहिला नव्हता. त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केला तर विरोधकांच्या पोटात दुखत आहे. यावेळी आमदार बनवा, तुम्हाला थेट विमान प्रवासाचा आनंदही देतो, असे शेळके म्हणाले.

विजयी संकल्प मेळाव्यापूर्वी आमदार शेळके यांचे प्रचंड उत्साह व जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘बच्चा बच्चा कहता है, सुनील अण्णा सच्चा है’, ‘सुनील अण्णा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘आमचं मत मावळच्या विकासाला’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

Novel NIBR Ads

आण्णांना भरभरुन मतदान करूयात…
मावळची जनता आमदार सुनील शेळके यांना काहीही कमी पडू देणार नाही, असंच आमचं ठरलंय, तालुक्यात केलेली ४,१५८ कोटींची विकास कामे, हीच तुमची ओळख आहे, मागीव ५ वर्षात आम्ही फक्त तुमचाकडे मागतोय. आता वेळ आपली आहे, आपण त्यांना आता भरभरून मते देऊन निवडून आणूयात, असे आवाहन संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक महादूबुवा कालेकर यांनी केले.

महादूबुवा कालेकर म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत दमदाटीला, धमक्यांना, लोभाला बळी पडू नका. आपण  केलेल्या कामाच्या जोरावर हक्काने महायुतीची उमेदवारी मिळवली आहे आणि आपण पक्षाचे तसेच महायुतीचे काम करतोय, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.

दिपाली गराडे म्हणाल्या की, “ यावेळी सुनील अण्णांचे मताधिक्य एक लाख पार होणार हे नक्की! आमचा लाडक्या भावाला एकटा पडलं म्हणून मी आणि सर्वच महिलांनी असा निश्चय केलाय की, या वेळी संपूर्ण ताकद लावून सुनील अण्णांना विक्रमी मताधिक्याने निवडून देऊ.”

सुनील अण्णांना परत विधान सभेत पाठवण्याची आतुरता, उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि ही भावना मनातून प्रेम असेल तरच चेहऱ्यावर येते. म्हणजेच येथे कोणी खोटा नाही. प्रत्येकजण खरा आहे, असे गणेश खांडगे म्हणाले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बापूसाहेब भेगडे यांच्या सदिच्छा भेटीत तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व महिलांचा मोठा प्रतिसाद । Bapu Bhegade
– निवडून आल्यास कुणाला पाठींबा देणार? बापूसाहेब भेगडे यांना समर्थन देणाऱ्या महाविकासआघाडीतील नेत्यांमध्ये संभ्रम
– आमदार सुनिल शेळके यांच्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ विजयासाठी महायुतीचा नियोजनबद्ध प्रचारावर भर । Sunil Shelke


dainik maval jahirat

Previous Post

“सुनीलअण्णांनी पाच वर्षे तालुक्याला भरभरून दिलंय, आता त्यांना भरभरून मतदान करूयात”

Next Post

पवन मावळ विभागातून बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचार बैठकांना उदंड प्रतिसाद । Bapu Bhegade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Discussion of vision of Bapusaheb Bhegde among women and youth of Maval taluka

पवन मावळ विभागातून बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचार बैठकांना उदंड प्रतिसाद । Bapu Bhegade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.