पुणे : पुणे व पिंपरी – चिंचवड महानगरामधील अन्नधान्य वितरण कार्यालयाअंतर्गत ११ परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात २५ रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://pune.gov.in वर उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज आदीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधित परिमंडळ कार्यालयात याबाबत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत. तरी इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत; मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी कळविले आहे.
#पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात २४१ ठिकाणी #रास्तभावदुकानपरवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करावे- जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.सीमा होळकर
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 5, 2023
जिल्ह्यातील १३ तालुक्यात २४१ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा
पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात २४१ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करावे – जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर ( Pune District Appeal to apply for cheap grain shop licence )
अधिक वाचा –
– “दादांनी आम्हाला विश्वासात घेऊन स्पष्टपणे सांगितलं होतं की आपल्याला सरकारमध्ये सामील व्हावं लागणार आहे” – सुनिल शेळके
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मध्यरात्री शिवनेरी बसचा अपघात! 7 जण जखमी, केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला वाचवण्यात यश