मावळ तालुक्यातील महत्वाचे शहर असलेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रस्तावित केलेल्या विविध विकास कामांसंदर्भात पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून बाळा भेगडे यांनी सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक आज (शुक्रवार, 3 फेब्रुवारी) रोजी घेतली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तळेगाव दाभाडे शहरातील प्रमुख रस्त्यांचे काम येत्या गुढीपाडव्याच्या आत पूर्ण करावे. तसेच, तळेगाव दाभाडे शहरात भुयारी गटार व पाणी योजनेचे काम संथ गतीने सुरु असून गेल्या काही दिवसांपासून गाव हद्दीतील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, यासंदर्भात योग्य तो मार्ग लवकर काढण्यासाठी बाळा भेगडेंनी सूचना केल्या. ( Pune District Planning Committee Member Bala Bhegde Held Meeting of Talegaon Dabhade Municipal Council Development Works )
यासह, आठवडे बाजारात येणाऱ्या महिलांची होणारी गैरसोय पाहता सुभाष मार्केटमध्ये महिलांसाठी शौचालय लवकर बांधून खुले करावे. तळेगाव दाभाडे मारुती मंदिर येथील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सफाईसाठी एजन्सी नेमावी, तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून दुकानदारांना लावण्यात येणाऱ्या करात सवलत देण्याच्याही सूचना भेगडे यांनी यावेळी केल्या.
सदर बैठकीला बाळा भेगडे यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष रविंद्र दाभाडे, भाजपा शहराध्यक्ष रविंद्र माने, मा नगरसेवक अरुण भेगडे-पाटील, शोभा भेगडे, अमोल शेटे, संतोष भेगडे पाटील, अरुण भेगडे, सचिन जाधव, नितीन पोटे, निर्मल ओसवाल, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, तळेगाव दाभाडे पोलीस निरीक्षक नितीन लांडगे, महाराष्ट्र विद्युत विभागाचे गजानन झोपे, तळेगांव नगरपरिषद क्षेत्रातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– कौतुकास्पद! सुप्रिम इंडस्ट्रीज कंपनीच्या कामगारांकडून उर्सेतील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना मोलाची मदत
– पवना कृषक सेवा सहकारी संस्थेवर 6 प्रशासकांची नियुक्ती; बाळा भेगडे आणि मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त प्रशासकांचा सत्कार