लोकसभा निवडणूक 2024 यासह अनेक जाती धर्माचे सण-समारंभ या अनुषंगाने कामशेत पोलिसांनी (ता. मावळ) सोमवारी (दिनांक 18 मार्च) सकाळी कामशेत शहरातून रूट मार्च काढला. कामशेत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली 4 पोलिस अधिकारी आणि 90 पोलीस अंमलदार कर्मचारी हे रूट मार्चमध्ये सहभगी झाले होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
माननीय पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील (कामशेत पोलिस स्टेशन) यांच्या सोबत 4 अधिकारी आणि सीआयएसएफ व स्थानिक पोलीस स्टेशन कडील एकूण 90 अंमलदार जवान ह्यांनी शक्ती प्रदर्शन रूट मार्चमध्ये सहभाग घेतला. ( Pune Gramin Kamshet Police Route March in background of Lok Sabha Election 2024 )
सध्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच निवडणुकीच्या सर्व तारखाही जाहीर झाल्या आहेत. यासह येत्या काळात होळी, रमजान, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यांसारखे सण उत्सव आहेत. त्या सर्वच अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी रूट मार्च काढल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील 71 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय, तोकड्या कपड्यांनी गेल्यास प्रवेश नाकारणार, वाचा यादी
– लोणावळा शहराजवळ अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्यांना पोलिसांचा दणका, हॉटेल मालकासह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल । Lonavala Crime News
– वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला सरकारची मान्यता, अजित पवारांच्या पाठपुराव्याला यश