पुणे : कर्वेनगर येथील भाऊसाहेब रंगारी शिवगर्जना मित्र मंडळातर्फे वनदेवी टेकडी परिसर कर्वेनगर भागात स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. ( pune karvenagar vandevi hill cleanup mission )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सध्या नैसर्गिक संपत्तीचे नागरिकांकडून विघटन होताना दिसत आहे. खरेतर आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराची निसर्गाची जबाबदारी आपल्यावर असते. अशावेळी नैसर्गिक टेकडीवर मद्यपान करणे, सर्रास कचरा टाकून टेकडीचे रूपांतर कचराकुंडीत करणे यामुळे परिसरातील निसर्ग सौंदर्य आणि पर्यावरण धोक्यात येते. त्यामुळे हा परिसर स्वच्छ करण्यासाठी शिवगर्जना मित्र मंडळाने पुढाकार घेऊन स्वच्छता अभियान राबवले.
सदर स्वच्छता अभियानावेळी मंडळाचे अध्यक्ष सुरज मोहिते, उपाध्यक्ष माही दळवी, कार्याध्यक्ष बालाजी पवार, उपकार्याध्यक्ष अभिजीत मोरे, शिवाजी कडू, कल्याणी , लहू वांजळे, दिलीप वाकडे सर्व पदाधिकारी, मंडळाचे हितचिंतक आणि नागरिक उपस्थित होते.
अधिक वाचा –
– तळेगाव आणि चाकण येथील रक्तदान शिबिरात तब्बल 133 सुरक्षा रक्षकांकडून रक्तदान
– कान्हे गावात प्रिया बेर्डेंच्या उपस्थितीत पार पडला पंतप्रधान मोदींचा 101वा ‘मन की बात’ कार्यक्रम