Pune Katraj Park Leopard Update : पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून पळालेल्या बिबट्याला पकडण्यात प्रशासनाला यश आले आहे. कात्रजमधील प्राणी संग्रहालयातून सोमवारी (दि. 4) बिबट्या पळाला होता. ही माहिती नागरिकांमध्ये पसरताच सर्वत्र चिंतेचे वातावरण तयार झाले होते. दोन दिवसांपासून या बिबट्याला पकडण्यासाठी प्राणी संग्रहालय प्रशासन प्रयत्न करत होते. अखेर मंगळवारी रात्री 9 वाजून 15 मिनिटांनी त्याला पुन्हा जेरबंद करण्यात आले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
बिबट्याला पकडण्यासाठी प्राणी संग्रहालयात लावण्यात आलेल्या जाळ्यांमध्ये तो अडकला आणि सर्वांनीच सुटकेचा श्वास टाकला. बिबट्या पळाल्याची माहिती मिळाल्यापासूनच पळालेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरु केले होते. हा बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयाच्या आवारातच असल्याचे समोर आले, आणि त्यामुळे बिबट्या मानवी वस्तीत शिरु नये व संग्रहालयातच त्याला पकडता यावे, यासाठी प्रयत्न सुरु होते. ( Pune Katraj Park Leopard Update Leopard Trapped In Museum Cage )
बिबट्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. प्राणी संग्रहालय प्रशासन आणि इतर विभाग हे त्याच्यावर नजर ठेऊन होते. प्राणी संग्रहालयातील त्याच्या हालचाली टिपण्यासाठी 9 ठिकाणी कॅमेरे आणि पिंजरे लावण्यात आले होते. त्यातील प्राणी संग्रहालयातील सांबर असलेल्या जवळपास ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या अडकला. मंगळवारी (दि. 5) रात्री 9 वाजून 15 मिनिटांनी बिबट्या जेरबंद झाला. ‘बिबट्याला पकडण्यामध्ये आम्हाला यश आले असून ऑपरेशन सक्सेसफुल झाल्याची’ माहिती संचालक राजकुमार जाधव यांनी दिली.
अधिक वाचा –
– एका दुचाकी चोराला पकडले आणि चोरीला गेलेल्या 19 दुचाकींचा शोध लागला! तळेगाव दाभाडे पोलिसांची भन्नाट कामगिरी । Talegaon Dabhade
– वेहेरगाव जिल्हा परिषद शाळेचा शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा; माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा । Karla News
– मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवारी पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या कामाचे उद्घाटन । PM Narendra Modi