पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे खासदार आणि महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री गिरीष बापट यांचे उपचारादरम्यान रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्राप्त माहितीनुसार, बुधवार (दिनांक 29 मार्च) रोजी सकाळी तब्येत खालावल्याने बापट यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आयसीयू वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. त्यांना लाईफ सपोर्टवरवर ठेवण्यात आले होते. प्रदीर्घकाळापासून बापट हे आजाराशी झुंज देत होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र आज अखेर त्यांची प्राणज्योत मावळली. ( Pune Lok Sabha MP Girish Bapat passed Away At Age of 74 In Dinanath Mangeshkar Hospital )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गिरीष बापट यांच्या निधनाने मतदारसंघातील त्यांचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या दुःख सागरात बुडाले आहेत. तसेच भाजपाचा बडा नेता हरपल्याने पक्षातील दिग्गजांकडूनही शोक व्यक्त केला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत आजारी असतानाही आणि श्वास घेण्यास अडचण होत असतानाही गिरीष बापट हे पक्षासाठी प्रचाराच्या मैदानात उतरले होते. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतूक झाले, मात्र विरोधकांकडून गिरीश बापटांच्या तब्येतीची हेळसांड केल्याबद्दल भाजपावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. #GirishBapat pic.twitter.com/qkATwWyx46
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2023
पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री गिरीष बापट यांचे आज दु:खद निधन झाले ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.या दु:खातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या परिवारास देवो.???? @GirishBapatBJP @BJP4Maharashtra @BJPLive pic.twitter.com/lLSEFn0Bfj
— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) March 29, 2023
गिरीश बापट यांची राजकीय कारकिर्द ;
1995 पासून ते 2019 पर्यंत ते कसबा विधानसभेतून सलग पाच वेळा आमदार झाले होते. त्यानंतर 2019 साली त्यांनी पुणे लोकसभा निवडणूक लढवली. 2019 ला त्यांनी काँग्रेसचे मोहन जोशी यांचा पराभव केला होता.
1980 – भाजपा युवामोर्चाचे शहर सरचिटणीस
2006 – पुणे भाजपा अध्यक्ष
1886-87 – पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष
अधिक वाचा –
– ‘मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळणार’, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम महाराज मोरे; अटीतटीच्या निवडणूकीत 9 मतांनी विजयी