मावळ तालुक्यातील लोकल रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. शिवाजीनगर लोकल टर्मिनलवरून लोणावळा मार्गावर आणखीन दोन लोकल वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. उद्या म्हणजेच दिनांक 20 फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी होईल. यामुळे आता शिवाजीनगरवरून लोणावळ्यासाठी सुटणाऱ्या लोकलची संख्या एकूण 6 झाली आहे. ( Pune Lonavla Local Railway News Two More Local Trains Will Depart From Shivajinagar )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिवाजीनगर लोकल टर्मिनलचे काही दिवसांपूर्वी उद्घाटन झाले होते. उद्घाटनानंतर शिवाजीनगरहून तळेगाव आणि लोणावळासाठी चार लोकल सुरु झाल्या होत्या. यातच आता रेल्वे प्रशासनाने सोमवार 20 फेब्रुवारीपासून पुणे रेल्वे स्टेशनवरून लोणावळा येथे सुटणाऱ्या आणखी दोन लोकल शिवाजीनगरवरून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विविध कामानिमित्त पुणे शहराकडे येणाऱ्या मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
नवीन वेळापत्रक ;
शिवाजीनगर ते लोणावळा : सकाळी 8.10, दुपारी 3.42, सायंकाळी 5.15, रात्री 7.05, रात्री 8.00, रात्री 9.02
लोणावळा ते शिवाजीनगर : सकाळी 6.30, सकाळी 10.05, दुपारी 3.30, सायंकाळी 5.30, सायंकाळी 6.08, रात्री 7.35
अधिक वाचा –
– श्रीरंग बारणेंचे मंत्रिपद फिक्स? आढळराव पाटलांनी भर सभागृहात चंद्रकांत पाटलांना केली ‘ही’ खास विनंती
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावात महाशिवरात्री निमित्त बहीण-भाऊ भेटीची अनोखी परंपरा