Dainik Maval News : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या नद्यांची पुररेषा नियंत्रित करून अतिरिक्त जागा विकासासाठी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने गुजरात राज्याच्या धर्तीवर रिव्हर बंडिंगचा पर्याय अभ्यासून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.
पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरपालिकेच्या पूररेषा बाधित क्षेत्रातील नव्या इमारतींचा विकास, जुन्या इमारतींचा पुनर्विकास व पूर्ण क्षमतेने टि. डी. आर वापर अनुज्ञेय करण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली.
बैठकीस आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, मुख्य अभियंता, संचालक, नगररचना पुणे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी व मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन
