Dainik Maval News : राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सोबत आता पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) वर्तुळाकार रस्त्याच्या (पुणे रिंग रोड) कामाला गती देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कदमवाकवस्ती येथील ग्रामस्थांनी भूसंपादन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकार्यांना विरोध केल्याने अधिकारी वर्गाला मोजणीविना माघारी फिरावे लागले.
रिंगरोडच्या पार्श्वभूमीवर त्या-त्या गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन मोजणीस सहकार्य करण्याची भूमिका दर्शवली होती. त्याबाबत ग्रामस्थांनी त्याचे म्हणणे अधिकार्यांकडेदेखील मांडले होते. त्याच अनुषंगाने कदमवाकवस्ती येथील ग्रामस्थांनीदेखील ना हरकत दिली होती. मात्र, एन मोजणीच्या वेळी मोठा विरोध झाला आहे.
काय आहेत गावकऱ्यांच्या मागण्या
– पाचपट मोबदला मिळावा
– रस्त्याची माहिती मिळावी
– नेमक्या किती क्षेत्रांमध्ये भूसंपादन होणार हे कळावे
पुणे रिंग रोड ( Pune Ring Road)
पुणे जिल्ह्यातील 13 गावांतील सुमारे 115 हेक्टर भूसंपादन करण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केले आहेत. त्यामुळे भूसंपादनाच्या कामास सुरुवात करण्यात आली. पीएमआरडीएने याबाबत पाठपुरावा करून या प्रकल्पाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली होती, मात्र कदमवाकवस्ती येथून सुरुवात करण्यात आलेली प्रक्रिया पुन्हा खोळंबली आहे.
‘पीएमआरडीए’ने 83 किलोमीटर लांबीच्या आणि 65 मीटर रुंदीच्या वर्तुळाकार रस्त्याचे काम हाती घेतले आहे. या रस्त्यासाठी सुमारे सातशे ते साडेसातशे एकर भूसंपादन करावे लागणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या शासकीय विभाग आणि काही वन विभागाचीदेखील मोठ्या प्रमाणात जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. ‘एमएसआरडीसी’ने हाती घेतलेला वर्तुळाकार रस्ता हा सोळू या गावापर्यंत येत आहे.
दरम्यान, इतर गावातील ग्रामस्थांनी मोजणीसाठी सहकार्य अपेक्षित असून, याबाबत ग्रामसभेत ठरावदेखील झालेला आहे. त्यामुळे भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुजर – निंबाळकरवाडी, पिसोळी, जांभूळवाडी, येवलेवाडी या ठिकाणी ग्रामस्थांनी मोजणीसंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number