नवीन शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांनी त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र लवकरात लवकर नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विद्यार्थी, शाळा प्रशासन व शालेय विद्यार्थी वाहतूकदारांच्या सोयीसाठी पूर्वनियोजित दिनांक व वेळ निर्धारित करून शासकीय सुट्टीच्या दिवशी स्कुल बस, व्हॅनकरीता योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तपासणीचे कामकाज सुरु राहणार आहे. ( pune rto appeal for renewal of fitness certificate of vehicles transporting students )
अशा वाहनधारकांनी वाहन सुट्टीच्या दिवशी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीकरीता सादर करण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालय, संगमपुल, पुणे येथील परिवहन बस विभागातून मॅन्युअल पध्दतीने अपॉइंटमेंट प्राप्त करुन घ्यावी व कार्यालयात शुल्क भरणा करावा. अपॉइंटमेंट किंवा शुल्क भरणा न केलेल्या वाहने योग्यता प्रमाणपत्र तपासणीसाठी ग्राह्य धरली जाणार नसल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
अधिक वाचा –
– किशोर आवारे हत्या प्रकरणी तपासाबाबत मोठी अपडेट! पोलिस आयुक्तांकडून आणखी एका विशेष पथकाची स्थापना
– ह्याला म्हणतात स्वागत..!! पवना शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांची बैलगाडीतून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक