पुण्यातून पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर, अहमदनगर व इतर ठिकाणी जाणाऱ्या आणि येणाऱ्या जड वाहनांना शहराच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. उद्या मंगळवार पासून (दि. 5) या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. त्यात शहरात विविध मोठे प्रकल्प (मेट्रो, उड्डाणपूल, विविध विकासकामे) सुरू असून अवजड वाहनांमुळे रस्त्यावरील जागा मोठ्या प्रमाणावर व्यापली जाऊन वाहतूकीस अडथळा निर्माण होतो आहे. नागरिकांना धोका निर्माण होण्याबरोबरच त्यांची गैरसोय होते. त्यामुळे जड-अवजड माल वाहतूक करणारे ट्रेलर, कंटेनर्स, मल्टी एक्सल वाहने वाहनांसाठी प्रायोगिक तत्वावर 5 मार्चपासून शहरात प्रवेश बंदीचे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी नव्याने काढले आहेत. ( Pune Traffic Jam Updates Entry Ban For Heavy Vehicles To Coming And Going From City )
जड वाहनांच्या बंदीचे आदेश खालीलप्रमाणे –
1. पुणे नगर मार्गावरून वाघोली पासून पुणे शहराकडे जड वाहनांस 24 तास प्रवेश बंद
– पर्यायी मार्ग : पुणे नगर रस्त्यावरून शिक्रापूर येथून उजवीकडे वळण घेऊन चाकण मार्गे पिंपरी चिंचवड व तळेगाव दाभाडे मार्गे मुंबईकडे जातील. या मार्गावरूनच अहमदनगरकडे वाहने जातील.
2. पुणे सोलापूर व पुणे सासवड रस्त्याने येणाऱ्या वाहनांना हडपसर नोबल हॉस्पिटल चौक खराडी बायपास चौकाकडे 24 तास प्रवेश बंद राहील.
– पर्यायी मार्ग 1 : पुणे सोलापूर रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांनी थेऊर फाटा येथून उजवीकडे वळण घेऊन थेऊर, लोणीकंद, शिक्रापूर मार्गे जावे.
– पर्यायी मार्ग 2 : पुणे सासवड रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांनी हडपसर येथे ‘यु टर्न’ घेऊन थेऊर फाटा येथून डावीकडे वळण घेऊन थेऊर, लोणीकंद, शिक्रापूर मार्गे पर्यंत जावे.
या ठिकाणापासून शहराचे अंतर्गत भागामध्ये येण्यास 24 तास प्रवेश बंद –
1. सोलापूर रस्ता नोबल हॉस्पिटल चौक
2. अहमदनगर रस्ता केसनंद फाटा वाघोली
3. मुंबई पुणे रस्ता हॅरीस ब्रीज
4. औंध रस्ता राजीव गांधी पुल
5. बाणेर रस्ता हॉटेल राधा चौक
6. पाषाण रस्ता रामनगर जंक्शन
7. पौड रस्ता चांदणी चौक
8. सिंहगड रोड वडगाव पुल चौक
9. सातारा रस्ता कात्रज चौक
10. सासवड रस्ता (बोपदेव घाट मार्ग) खडी मशीन चौक
11. कात्रज मंतरवाडी बायपास रस्ता उंड्री चौक
12. आळंदी रस्ता बोफखेल फाटा चौक
अधिक वाचा –
– मावळ दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! एकनाथ शिंदे यांची जबरदस्त खेळी, खासदार बारणेंना होणार फायदा । Maval Lok Sabha
– तळेगाव दाभाडे शहरात आमदार सुनिल शेळकेंचा झंझावात! एका दिवसात 17 ठिकाणी भूमिपूजन आणि नागरिकांशी संवाद
– शिळींब येथे आदिवासी कातकरी कुटुंबाची झोपडी जळून खाक; गरीब आदिवासी बांधवांना मदतीची प्रतिक्षा । Maval News