Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १४ जून २०२५ रोजी शुभारंभ होणार आहे. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा सर्वांगीण विकास साधणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पुणे जिल्ह्यातील ३०३ केंद्रांमधील ३०३ शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.
या उपक्रमामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा भौतिक व शैक्षणिक गुणवत्तेबाबत कायापालट होणार आहे. शालेय शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढेल आणि सीएसआरच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. एसटीईएम लॅब, संगणक लॅब व कोडींगच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार केले जाईल. जर्मन व फ्रेंच भाषेचे शिक्षण देण्यात येणार असून परकीय भाषा शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे जागतिक ज्ञान वाढेल.
विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळेल, ज्यामुळे सर्वासाठी समान संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी कळविले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अहमदाबाद विमान दुर्घटना : विमानातील एक प्रवासी बचावला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती, मृतांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश
– एकीवर दोघांचे प्रेम आणि सोळा वर्षीय मुलाची हत्या… देहूरोड हादरलं ! भेटायला बोलावलं आणि चाकूने भोकसलं । Dehu Road Crime
– आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानंतर देहू नगरपंचायत प्रशासनाची तातडीने कारवाई ; रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली । Dehu News