Dainik Maval News : बंदी आदेशाचे उल्लंघन करून लोणावळा शहरातून प्रवास करणाऱ्या जड – अवजड वाहनांवर वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. दोन दिवसांत 425 कारवाया करीत 4 लाख 67 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
लोणावळा शहरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर जून 2024 मध्ये जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित करीत शहरातून होणाऱ्या जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत कायमस्वरूपी बंदी घातली. मात्र या आदेशाचे उल्लंघन करीत शहरातून सर्रासपणे अवजड वाहने जात आहे.
काही दिवसांपूर्वी एका अवजड वाहनामुळे झालेल्या अपघातात महिलेला जीव गमवावा लागला. त्यानंतर अवजड वाहनांचा विषय ऐरणीवर आल्याने शहर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार अनिल शिंदे, सचिन कडाळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल फाळके यांनी कारवाई सुरु केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आंदर मावळातील बेलज – राजपुरी रस्त्याची प्रचंड दुरावस्था ! पर्यटन व्यवसायावर होतोय परिणाम । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’
– मावळवासियांना मोठा दिलासा ! वडगाव येथे कायमस्वरुपी उपविभागीय कार्यालय सुरु होणार । Maval News