पवन मावळातील औंढोली गावात एका बंगल्यामध्ये 3 फुटू भारतीय अजगराचे पिल्लू आढळले आहे. याबद्दल माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी अजगराला पकडून त्याची तपासणी करुन त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूपपणे सोडून दिले. मावळमधील या भागात दाट जंगल आणि तिथेच मानवी वस्ती असल्याने साप आढळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. औंढोली गावात एकाच ठिकाणी मागील दहा दिवसात दोन अजगर आढळले आहेत. ( Python baby found in Aundholi village Pavan Maval News
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
औंढोली गावात एका बंगल्यात साप असल्याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य मोरेश्वर मांडेकर यांना मिळाली. मोरेश्वर मांडेकर यांनी तात्काळ औंढोली गावाकडे धाव घेतली. बंगल्यामध्ये माळी काम करणाऱ्या कामगाराने मांडेकर यांना बंगल्यामध्ये असलेला साप दाखवला. मांडेकर यांनी अजगराला पकडून वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे व वन विभागाचे अधिकारी हनुमंत जाधव यांना माहिती दिली. अजगराची प्रकृती चांगली असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
नागरिकांना परिसरात वन्यप्राणी आढळून आल्यास त्याची माहीती वन विभाग टोल फ्री क्रमांक 1926 किवां वन्यजीव रक्षक मावळ संस्था अथवा जवळच्या प्राणी मित्रांना द्यावी असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– समृद्धी महामार्गावर अग्नीतांडव! पुण्याला निघालेल्या बसचा बुलढाण्यात भीषण अपघात, 25 जणांचा आगीत होरपळून मृत्यू
– हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मावळ पंचायत समिती सभागृहात प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान