मावळ कृषि विभागाने ( Maval Agriculture Department ) शेतकऱ्यासाठी रब्बी हंगाम पूर्वतयारी मार्गदर्शन कार्यशाळा ( Rabi Season Preparatory Workshop ) मौजे तळेगाव राष्ट्रीय सुगी पश्चचात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे ( Talegaon Dabhade ) येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मागील वर्षीचे विभागस्तर, तालुकास्तर भात पिकस्पर्धा विजेते शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला.
विजेत्या शेतकऱ्याचे भातउत्पादन वाढबाबत मनोगत आणि रब्बी हंगाम पूर्वतयारी कशा पद्धतीने करावी याबाबत शास्त्रज्ञ नरेंद्र काशीद व हनुमंत घाडगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रब्बी हंगामात ही सुयोग्य नियोजन शेतकऱ्यांना गावोगावी प्रशिक्षण घेऊन भाजीपाला, मसूर, गहू, ज्वारी, कांदा या पिकांची माहिती देऊन शेतीशाळा प्रात्यक्षिक घेण्यात येणार असल्याचे तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले. ( Rabi Season Preparatory Workshop and Guidance Camp through Maval Agriculture Department at Talegaon Dabhade )
अधिक वाचा –
श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना वार्षिक सभा : ‘मावळ, मुळशीतील अनेक शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन कमी’
मावळवासियांसाठी गुडन्यूज!
View this post on Instagram