Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पुसाणे गावात सुरू असलेल्या दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारला. या कारवाईमध्ये पोलिसांनी आठ हजार लिटर रसायन नष्ट केले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 3) सायंकाळी करण्यात आली.
याप्रकरणी पुसाणे येथील 22 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम साबळे यांनी मंगळवारी (दि. ३) शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने पुसाणे गावात ओढ्याच्या बाजूला गावठी दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली. याबाबत शिरगाव पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली.
कारवाईमध्ये 30 हजार रुपये किमतीचे 8000 लिटर दारू तयार करण्यासाठी भिजत घातलेले रसायन नष्ट करण्यात आले. पोलीस आल्याची चाहूल लागतात आरोपी महिला पळून गेली. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश