Dainik Maval News : धावत्या रेल्वेगाड्यांवर रंगाने भरलेले फुगे फेकल्यास कारवाई करण्याचा इशारा लोहमार्ग पोलिसांनी दिला आहे. होळी तसेच धूलिवंदनानिमित्त लोहमार्ग पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. होळी तसेच धूलिवंदनानिमित्त मोठ्या प्रमाणावर रंग खेळला जातो.
उत्साहाच्या भरात काही जण धावत्या रेल्वेगाड्यांवर रंगाने भरलेले फुगे फेकतात. दाट वस्तीतून जाणार्या रेल्वेगाड्यांवर फुगे फेकण्यात येतात. या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलिसांकडून पुणे रेल्वे स्थानक, शिवाजीनगर, लोणावळा, चिंचवड तसेच दौंड स्थानक परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.
धावत्या रेल्वेगाडीवर फुगे फेकल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा लोहमार्ग पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिला आहे. दरम्यारन, होळी, धूलिवंदनानिमित्त पुणे शहर, परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News