व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे-लोणावळा लोहमार्गावर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेची प्रतीक्षा कायम ; पाच वर्षापासून राज्य सरकारची दिरंगाई । Pune Lonavala Local

पुणे-लोणावळा लोहमार्गावर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा पहिला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करून चार वर्षे लोटली आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 13, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Pune-Lonavla-Local

File Photo : Pune Lonavla Local


Dainik Maval News : पुणे-लोणावळा लोहमार्गावर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा पहिला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करून चार वर्षे लोटली आहेत. तर सुधारित अहवालास वर्ष होत आले आहे. यानंतरही राज्य सरकारच्या दफ्तरी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प विचाराधीन आहे. या प्रकल्पाचा पूर्वी 4884 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. तो आता 5100 कोटी झाला.

  • राज्यातील प्रमुख मंत्र्यांनी हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल, अशी घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र काहीच झाले नाही. सरकारने या प्रकल्पासाठी अर्धा खर्च करण्याची तयारी दर्शविली. मात्र परिपत्रक काढले नाही. त्यामुळे रेल्वेने हा प्रकल्प साइड ट्रॅकवर ठेवला आहे. याचा फटका सामान्य प्रवाशांना बसत आहे. राज्यातील दोन महानगर असणाऱ्या पुणे व मुंबईला कमी वेळेत जोडण्यासाठी व रेल्वेची वारंवारिता वाढविण्यासाठी हा प्रकल्प पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.

मात्र सरकारने यासाठी बैठकी घेण्यापलीकडे काहीच केले नाही. राज्य सरकारच्या सूचनेनंतर मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) डीपीआर सादर केला. पाच वर्षांत दोनवेळा डीपीआर सादर करण्यात आला. मात्र त्यावर निर्णयच झाला नाही. परिणामी प्रकल्पाला दिरंगाई होत आहे. पाच वर्षांत प्रकल्पाची किंमत 216 कोटी रुपयांनी वाढली आहे.

पुणे-लोणावळादरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा प्रकल्प रखडल्याने त्याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. पुणे- मुंबई दरम्यान धावणाऱ्या रेल्वे व मालगाड्यांची संख्या जास्त आहे. याशिवाय लोणावळा ते कर्जत हा घाट विभाग असल्याने गाड्यांचा वेग कमी असतो. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होतो. त्यामुळे पुणे ते लोणावळादरम्यान तिसरी व चौथी मार्गिका असणे आवश्यक आव्यक आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News


Previous Post

धावत्या रेल्वेगाड्यांवर रंगाने भरलेले फुगे फेकाल तर खबरदार ! लोहमार्ग पोलिसांचा कारवाईचा इशारा

Next Post

संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र देहूगाव परिसरातील वाहतुकीत मोठे बदल – जाणून घ्या

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Major changes in traffic in Dehugaon area on occasion of Sant Tukaram Maharaj Bij ceremony

संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र देहूगाव परिसरातील वाहतुकीत मोठे बदल - जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.