व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 2, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राज ठाकरेंनी भाकरी फिरवली ; मावळ तालुका मनसेत मोठे फेरबदल, तालुकाध्यक्षपदी अशोक कुटे यांची निवड । Maval News

गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर केल्याप्रमाणे राज ठाकरे यांनी संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये अनेक मोठे बदल करायला सुरूवात केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 11, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Raj Thackeray appoints Ashok Kute as MNS Maval Taluka President

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर केल्याप्रमाणे राज ठाकरे यांनी संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये अनेक मोठे बदल करायला सुरूवात केली आहे. राज्यस्तरीय, विभागस्तरीय पदाधिकारी निवडीनंतर आता तालुका पातळीवर संघटनात्मक जबाबदाऱ्या नव्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर द्यायला पक्षाने सुरूवात केली आहे. त्यानुसार मावळ तालुक्यातही पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी नवीन निवड करण्यात आली असून अशोक वसंत कुटे यांच्या खाद्यावर तालुक्याच्या नेतृत्वाची धूरा देण्यात आली आहे.

novel ads

वेहेरगाव येथील अशोक वसंत कुटे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मावळ तालुका अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक कुटे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. कुटे यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या नेतृत्वात मावळ तालुक्यात मनसे नव्याने उभारी घेईल असे बोलले जात आहे.

  • अशोक कुटे हे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंच्या समवेत काम करीत आहेत. मागील दहा वर्षापासून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी आघाडीचे मावळ तालुका अध्यक्षपद सांभाळले आहे. मावळ तालुक्यातील विविध सामाजिक विषयांवर त्यांनी खास मनसे पद्धतीने आंदोलने केली आहेत व त्या आंदोलनांना अपेक्षित यश देखील प्राप्त झाले आहे.

नुकतेच मराठी भाषा व मराठी पाट्या या विषयावर त्यांनी आंदोलन केले होते. बँक ऑफ महाराष्ट्र यामध्ये असणारे अधिकारी व कर्मचारी हे ग्राहकांची मराठी भाषेमध्ये बोलत नसल्याने त्यांनी बँकेचे अधिकारी यांची मनसैनिकांसह भेट घेत कान उघडणी केली होती, ह्या प्रकरणाची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली होती. तसेच मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वरसोली टोल नाक्यावर दोन्ही बाजूला स्थानिकांसाठी एक लेन सतत सुरू ठेवावी, याबाबतही त्यांनी आवाज उठविला होता.

अशोक कुटे यांच्या या कामाची दखल घेत त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तथा सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी मावळ तालुका अध्यक्ष या पदावर त्यांची नियुक्ती केली आहे. या पुढील काळातही पक्षाची ध्येयधोरणे विचार, मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवत त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका निवडीनंतर बोलताना कुटे यांनी मांडली.

24K KAR SPA ads

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates


dainik maval ads

tata car ads

Previous Post

स्वबळावर लढण्याची तयारी हवी ; कामशेत येथील मेळाव्यात रामदास आठवले यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन । Kamshet News

Next Post

‘भुंगा’ आणि ‘महेरबान’ ठरले ‘आई एकविरा देवी केसरी’चे मानकरी । Karla News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bailgada Sharyat at Vehergaon Karla Ekvira Devi Yatra 2025

'भुंगा' आणि 'महेरबान' ठरले 'आई एकविरा देवी केसरी'चे मानकरी । Karla News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Road blockade against inspection and action taken by Highway Police on tourist vehicles at Khandala Exit on Expressway

द्रुतगती मार्गावरील खंडाळा एक्झिट येथे महामार्ग पोलिसांकडून पर्यटकांच्या वाहनांची होणारी तपासणी व कारवाईच्या विरोधात रास्ता रोको । Lonavala News

August 2, 2025
Poultry-farming

मावळ तालुक्यात पोल्ट्री शेड नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; साडेचारशेहून अधिक व्यावसायिकांची नोंद । Maval News

August 2, 2025
Crime

उर्से गावात गांजा विक्री प्रकरणी एकाला अटक, शिरगाव पोलिसांची कारवाई । Maval Crime

August 2, 2025
Biker beaten up for demanding compensation Incident at Somatane Phata Maval

‘आमच्याकडे काय बघतोस’ असे म्हणत लाथा बुक्क्यांनी केली मारहाण ; सोमाटणे फाटा येथील प्रकार । Maval Crime

August 2, 2025
meeting held under chairmanship of Anna Bansode to address problems in Pimpri-Chinchwad industrial area

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

August 2, 2025
Prime Minister Narendra Modi Cabinet Meeting

केंद्रीय मंत्रिमंडळाची चार बहुमार्गीकरण प्रकल्पांना मंजुरी ; महाराष्ट्रासह सहा राज्यांतील १३ जिल्ह्यांचा समावेश, २०२८-२९ पर्यंत काम पूर्ण होणार

August 2, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.