व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ शहरात राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा । Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील येथील शिवजयंती उत्सव समितीने चार दिवसांच्या महोत्सवाचे आयोजन केले होते. दिनांक 25 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत हा सोहळा सुरु होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 30, 2024
in लोकल, शहर
shivjayanti-vadgaon-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ येथील येथील शिवजयंती उत्सव समितीने चार दिवसांच्या महोत्सवाचे आयोजन केले होते. दिनांक 25 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत हा सोहळा सुरु होता. विविध स्पर्धा, भव्य मिरवणूक, पुरस्कार वितरण, शाहिरी कार्यक्रम व ऐतिहासिक नाटक अशा विविध कार्यक्रमांनी राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव साजरा झाला. विविध क्षेत्रातील गुणवंतांचे कौतुक, सर्वधर्मीय नागरिकांमध्ये एकोपा व गावचे गावपण जपण्याच्या उद्देशाने गेल्या 45 वर्षांपासून हा शिवजयंती महोत्सव सुरू असल्याचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर यांनी सांगितले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

दिनांक 25 तारखेला होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मावळ खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शिवाजी असवले, उपाध्यक्ष अमोल भोईरकर, संचालक गणेश विनोदे आदींच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन झाले व त्यानंतर जय बजरंग तालीम मंडळाच्या संयोजनाने दगडी गोटी उचलण्याची स्पर्धा झाली. दिनांक 26 तारखेला सकाळी वडगाव सोसायटीचे अध्यक्ष नीलेश म्हाळसकर, पंढरीनाथ भिलारे आदींच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन झाले. सायंकाळी महिलांसाठी ‘खेळ खेळूया पैठणीचा’ हा स्पर्धात्मक कार्यक्रम झाला. विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे मानाची पैठणी, सोन्याची नथ व चांदीचा छल्ला अशी पारितोषिके देण्यात आली. सहभागी सर्व महिलांना अनिता संभाजी म्हाळसकर यांच्यावतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. नीता चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. ( Raje Shiv Chhatrapati Jayanti Festival celebrated with great enthusiasm in Vadgaon Maval )

दिनांक 27 तारखेला सकाळी देवस्थानचे विश्वस्त गणेश ढोरे, सुभाष जाधव, नारायण ढोरे आदींच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन झाले. सायंकाळी शाहीर आविष्कार देशिंगे ( सांगली ) यांचा पोवाड्यांचा बहारदार कार्यक्रम झाला. गुरुवारी (दिनांक 28) सकाळी सातला शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, अध्यक्ष अनंता कुडे व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन झाले. महिला संचालक व सहजयोग केंद्राच्या सहभागाने शिवजन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा झाला. विविध किल्ल्यावरून आलेल्या शिवज्योतींचे लायन्स क्लबच्यावतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर लहान मुलांसाठी विविध स्पर्धा तसेच महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. सायंकाळी बँड पथकाच्या साह्याने शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत भगवे फेटे परिधान करून, महिलांसह शिवप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सायंकाळी स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ व विविध क्षेत्रातील व्यक्तींचा पुरस्कार वितरण सोहळा झाला. रायबा या छत्रपतींच्या जीवनावरील ऐतिहासिक नाटकाने महोत्सवाची सांगता झाली.

पुरस्कारार्थींची यादी ;
रतनबाई बाफना (राजमाता जिजाऊ पुरस्कार)
पांडुरंग महाराज गायकवाड ( सांप्रदायिक भूषण पुरस्कार)
पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे ( कर्तव्यदक्ष पुरस्कार )
मारुतराव दळवी (कृषिनिष्ठ पुरस्कार )
संतोष भिलारे (युवा उद्योग रत्न पुरस्कार)
राजू माडगी व सूरज पाटोळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा –
– मावळ लोकसभेसाठी मराठा समाजाकडून ‘या’ नावाची होतेय चर्चा । Maval Lok Sabha Election 2024
– आमदार सुनिल शेळके हे श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार का? । Maval Lok Sabha Election 2024
– महत्वाची बातमी! पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालय मार्च अखेरीस सुट्टीच्या दिवशी देखील सुरु राहणार । Pimpri Chinchwad Regional Transport Office


Previous Post

निलेश लंकेंचा अजितदादांना ‘रामराम’, आमदारकीचा राजीनामा देताना अश्रू अनावर, लोकसभेची ‘तुतारी’ फुंकली । mla nilesh lanke resigned ncp

Next Post

‘तुम्ही निवडून यालच..आपल्याला हा गड राखायचाय’, उद्धव ठाकरे यांच्याकडून संजोग वाघेरेंना प्रचार सुरु करण्याचे आदेश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sanjog-Waghere-Uddhav-Thackeray

'तुम्ही निवडून यालच..आपल्याला हा गड राखायचाय', उद्धव ठाकरे यांच्याकडून संजोग वाघेरेंना प्रचार सुरु करण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.