मोरया महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने वडगाव मावळ पोलीस स्टेशन इथे कार्यरत असलेल्या पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन ( raksha bandhan 2023 ) सण साजरा करण्यात आला. आपण सर्व जण घरी बसून आपल्या कुटुंबाबरोबर सण उत्सव साजरे करत असतो. परंतू पोलिस बांधव जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र कर्तव्यावर असतात. त्यांना हे सण उत्सव सामान्यांसारखे साजरे करता येत नाही. ( Rakhi with khaki in Vadgaon maval Women colleagues of Morya Pratishthan tie rakhi to police brothers )
पोलिस बांधवांनाही सर्व सण साजरे करता यावेत, त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा ह्यासाठी रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्यातील पवित्र सण मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव मावळ पोलिस स्टेशन इथे साजरा करण्यात आला.
यावेळी पोलिस निरीक्षक कुमार कदम, पोलिस अंमलदार सुनिल मगर, श्रीशल्य कंटोळी, सुपे साहेब, भाऊसाहेब खाडे आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, उपाध्यक्षा चेतना ढोरे, कार्याध्यक्षा प्रतिक्षा गट, माजी नगरसेविका पूनम जाधव, कविता मोरे, अमृता कांबळे, भारती शिरसाठ आदी संचालिका आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पंतप्रधान मोदींचे देशातील महिला-भगिनींना रक्षाबंधनाचे मोठे गिफ्ट; एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 200 रुपयाने कमी
– मावळ तालुक्यात शिवसेना उ.बा.ठा. पक्षाची नव्याने बांधणी; गट आणि गण स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर, पाहा यादी
– महादेव जानकरांचा ‘स्वबळाचा’ नारा, लोकसभेच्या सर्व जागा लढणार, भाजपवर घणाघात, स्वतःसाठी मनात बारामती फिक्स?