व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोरया महिला प्रतिष्ठान आयोजित मेकअप सेमिनार उपक्रमाला उदंड प्रतिसाद । Vadgaon Maval

मोरया महिला प्रतिष्ठान मार्फत जागर स्त्री सौंदर्याचा कार्यक्रम अंतर्गत वडगाव मावळ शहरात प्रथमच आयोजित केलेल्या भव्य मेकअप सेमिनार या कार्यक्रमाला वडगावमधील सुमारे अडीच हजार महिलांनी उपस्थिती दाखवली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 18, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
makeup-seminar-vadgaon

Photo Courtesy : Yashwant Shinde


मोरया महिला प्रतिष्ठान मार्फत जागर स्त्री सौंदर्याचा कार्यक्रम अंतर्गत वडगाव मावळ शहरात प्रथमच आयोजित केलेल्या भव्य मेकअप सेमिनार या कार्यक्रमाला वडगावमधील सुमारे अडीच हजार महिलांनी उपस्थिती दाखवली होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभीच अंधश्रद्धेला फाटा देत शहरातील विधवा महिलांना मान देऊन काही विधवा माता, महिला-भगिनींच्या शुभहस्ते सरस्वतीचे पूजन करून या भव्य एकदिवसीय कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सुनील शेळके, मावळ तालुका कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिपाली गराडे, तळेगाव रा काँ शहराध्यक्षा शैलजा काळोखे, नगरसेविका माया चव्हाण, पूजा वहिले यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

नगराध्यक्ष मयूर ढोरे, संजना बाळासाहेब ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेविका पूनम जाधव, प्रसिद्ध मेकअप अर्टिस्ट जयश्री दौंडकर, प्रज्ञा खोत, उपाध्यक्षा प्रतिक्षा गट, कार्याध्यक्षा चेतना ढोरे आणि प्रतिष्ठानच्या संचालिका, सदस्या व महिला भगिनी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ( good response from women to makeup seminar activity organized by Morya Mahila Pratishthan in Vadgaon Maval )

मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून भेगडे लॉन्स येथे झालेल्या या भव्य मेकअप सेमिनार मध्ये प्रशिक्षक जयश्री दौंडकर व प्रज्ञा खोत यांनी महिला भगिनींना मेकअप संबंधित अनेक प्रकारचे मार्गदर्शन केले. यात सेल्फ मेकअप, हेअर स्टाईल, मेकअप टिप्स, साडी ड्रेपरी, ऑयली स्किन, आय मेकअप इत्यादी प्रकारांचे अभ्यास सत्र पार पडले.

अतिशय उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न होत असताना मेकअप केलेल्या महिला भगिनींनी रॅम्प ऑक करत कार्यक्रमात खूपच मोठी रंगत आणली होती. यावेळी महिलांसाठी स्पर्धात्मक आणि मनोरंजनपर विविध विषयांवर प्रश्न उत्तरे, उखाणे घेणे आदी प्रकारात लकी ड्रॉ पद्धतीने बक्षीसे देण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमादरम्यान सहभागी तसेच उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींना मोरया महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून अबोली ढोरे यांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रम सरतेशेवटी मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचलिकांनी उपस्थित असलेल्या सर्व भगिनींचे आभार व्यक्त केले.

अधिक वाचा –
– दुर्दैवी! जिथे आडोसा घेतला तिथेच काळाने घाला घातला, किवळे इथे होर्डिंग्ज कोसळून 5 जण ठार
– ‘अनधिकृत होर्डिंग्ज उभारणाऱ्यांवर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी’ – आमदार सुनिल शेळके


Previous Post

दुर्दैवी! जिथे आडोसा घेतला तिथेच काळाने घाला घातला, किवळे इथे होर्डिंग्ज कोसळून 5 जण ठार

Next Post

‘जीवात जीव तोवर राष्ट्रवादीतच…कुणाच्याही सह्या घेतलेल्या नाहीत…माझ्याविषयी होत असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नाही’ – अजित पवार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ajit-Pawar

'जीवात जीव तोवर राष्ट्रवादीतच...कुणाच्याही सह्या घेतलेल्या नाहीत...माझ्याविषयी होत असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नाही' - अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
voting

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक

April 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.