अनधिकृत होर्डिंग्ज उभारणाऱ्यांवर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केली आहे.
सोमवारी (दिनांक 17 एप्रिल) वाऱ्यासह झालेल्या पावसात देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर रस्त्याच्या बाजुला लावलेले एक होर्डिंग्ज कोसळले. या दुर्घटनेत दुर्दैवाने चार महिला आणि एका पुरुषाचा मृत्यु झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. ( Action should be taken against those erecting unauthorized hoardings and officials supporting them said MLA Sunil Shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘अशा अनधिकृत होर्डिंग्जमुळे आजपर्यंत अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर असे अनधिकृत होर्डिंग्ज जाहिरात कंपनीकडून उभारले जात आहेत. त्यांच्यावर कारवाई तर व्हावीच, परंतु त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे,’ असे आमदार सुनिल शेळके यांनी यावर बोलताना म्हटले.
तसेच, रावेत परिसरात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेला. अशा घटनांचा गांभीर्यपूर्वक विचार झाला पाहिजे. या अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील आमदार शेळके यांनी केली.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहरातील दिव्यांग बांधवांना पूर्ववत 3 हजार रुपये मासिक अनुदान मिळणार
– वडगावमधील सामुदायिक विवाह सोहळ्यात 11 जोडपी विवाहबद्ध
– टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत 34 वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू, टाकवे-वडेश्वर रोडवरील घटना