Dainik Maval News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने स्माईल व्यसनमुक्ती केंद्रात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नशेच्या आहारी गेलेले अनेक रुग्ण या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचार घेत आहेत. त्यांना रक्षाबंधनाच्या दिनी राखी बांधून रोटरी सिटीच्या महिला सदस्यांनी आनंदाची भेट दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शिरगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी रुग्णांना मार्गदर्शन करताना लवकरात लवकर आपण बरे व्हा, नशा मुक्त व्हा आणि आपापल्या घरी जाऊन नवीन आयुष्याची सुरुवात करा, असे आवाहन केले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी मॅडम उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना अध्यक्ष किरण ओसवाल यांनी या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या घरच्यांबरोबर नाही आहात, परंतु लवकरच या ठिकाणी उपचार घेऊन नशेतून मुक्त होऊन भाऊबीज तुम्ही तुमच्या घरी बहिणी सोबत मोठ्या थाटामाटात साजरी करावी.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला वचन देण्यात यावे, भाऊबीज ही तुझ्याबरोबर नशेतून मुक्त होऊन मोठ्या थाटामाटात साजरी करेल, असे वचन आजच्या दिवशी बहिणीला द्यावे असे आवाहन अध्यक्ष किरण ओसवाल यांनी केले. स्माईल व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने अध्यक्ष हर्षल पंडित यांनी सर्वांचे स्वागत केले आणि व्यसनमुक्ती केंद्राची माहिती दिली. ( Raksha Bandhan celebrated at Smile De-Addiction Center on behalf of Rotary Club of Talegaon Dabhade City )
रुग्णांच्या घरून आलेले भेटकार्ड आणि त्यामध्ये बहीण भावाचे असलेले फोटो पाहून रुग्णांची मने हेलावून गेली. रोटरी सिटीच्या फर्स्ट लेडी अनिता ओसवाल, प्रकल्प प्रमुख सुनंदा वाघमारे, शरयू देवळे, डॉ. धनश्री काळे, सौ पंडित, सौ कदमताई, असिस्टंट गव्हर्नर दीपक फल्ले, संतोष परदेशी, राकेश ओसवाल, विश्वास कदम उपस्थित होते. उपाध्यक्ष भगवान शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– शिष्यवृत्ती परीक्षेतील चमकदार कामगिरीसाठी कान्हे शाळेतील विद्यार्थी हिंदूराज कुटे याचा जिल्हास्तरावर गौरव । Maval News
– आदर्श केंद्र शाळा कान्हे येथे स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा । Maval News
– अजितदादांनी शब्द पाळला ! मावळातील 42 हजार भगिनींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा