“वराळे गावच्या हाद्दीतील समता कॅालनीतील शशिकांत रमेश गिरी यांच्या घरी कोणता तरी वेगळाच प्राणी आला” असा फोन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य रोहीत दाभाडे आणि शेखर खोमणे यांना आला. तसेच सदर प्राण्याचे फोटो मागवला असता, त्या फोटोवरुन ते खवल्या मांजर असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेच याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना दिली आणि वराळे गावात पोहोचले. ( rare khawlya manjar Pangolins found in varale village Of maval )
काही वेळातच खवल्या मांजर असलले ठिकाणी संकेत मराठे, निनाद काकडे, प्रथमेश मुंगनेकर, शेखर खोमणे, रोहीत दाभाडे, रोहन ओव्हाळ, नयन कदम, भास्कर माळी, गणेश गायकवाड, दत्ता भोसले, निलेश गराडे हे त्या ठिकाणी पोहोचले. तिथे पाहाणी केली असता खवल्या मांजर हे जनरेटर रुममध्ये बसल्याचे दिसले. घरातील अन्य सदस्य घाबरलेले होते, तसेच परिसरात भरपूर लोकवस्ती होती. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या भीतीने ते खवल्या मांजर घाबरुन घरात शिरले असावे, असा अंदाज व्यक्त केला गेले.
निलेश गराडे यांनी याची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर खवल्या मांजराला सुरक्षितरित्या पकडून डॉ. दडके यांच्याकडे प्राथमिक तपासणी करुन त्याला लगलीच जवळच्या जंगलात सोडण्यात आले. हे अतिशय दुर्मीळ असे खवल्या मांजर असून 9 वर्षापूर्वी देहूरोड इथेही आढळून आले होते, अशी माहिती निलेश गराडे यांनी दिली. ( rare khawlya manjar Pangolins found in varale village Of maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वडगाव साखळी रस्त्याच्या कामाबाबत नगरपंचायत प्रशासन ऍक्टिव्ह मोडमध्ये; रस्त्याला अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार
– गौरी-गणपतीसाठी सरकारकडून 100 रुपयात मिळणार ‘आनंदाचा शिधा’, पाहा कधी आणि कुणाकुणाला मिळणार शिधा?
– स्वातंत्र्यानंतर प्रथमच उंबरवाडीतील कातकरी बांधवांना मिळाले जातीचे दाखले; आमदार शेळकेंचे मानले आभार