व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मनोज जरांगेंच्या आवाहनाला मावळ तालुक्यात मराठा समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद; आंदोलकांनी थेट जुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला । Maratha Samaj Rasta Roko Andolan

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथील त्यांच्या उपोषणस्थळावरून राज्यभरातील मराठा बांधवांना आज (शनिवार, दि. 24) गावागावात रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 24, 2024
in पुणे, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Maratha-Samaj-Rasta-Roko-Andolan

Photo Courtesy : Team Dainik Maval


मराठा आरक्षणाचे ( Maratha Reservation ) नेते मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथील त्यांच्या उपोषणस्थळावरून राज्यभरातील मराठा बांधवांना आज (शनिवार, दि. 24) गावागावात रास्ता रोको आंदोलन ( Maratha Samaj Rasta Roko Andolan ) करण्याचे आवाहन केले होते. जरांगे यांच्या या आवाहनाला सकल मराठा समाज मावळ तालुका ( Maval Taluka ) यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सकल मराठा समाजाने शनिवारी (दि. 24) जुना मुंबई – पुणे महामार्ग ( Old Mumbai Pune Highway ) काही काळ रोखून धरला, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मनोज जरांगे पाटील यांनी, सरकारने मराठा समाजाच्या ‘सगेसोयऱ्यांना आरक्षण’ याबाबत काढलेल्या अध्यादेशच्या नोटीफिकेशनचा कायदा पारित करुन त्याची अंमलबजावणी करावी, यासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे. दरम्यान सरकारला मराठा समाजाच्या ताकदीचा पुन्हा दाखला देण्यासाठी जरांगे यांनीच मराठा समाजाला आज राज्यभर आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सकल मराठा समाज मावळ यांकडून कार्ला फाट्यावर मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर सकाळी 11 वाजता रस्ता रोका आंदोलन करण्यात आले. ( Rasta Roko Andolan on Old Mumbai Pune Highway at Karla Phata by Sakal Maratha Samaj Maval Taluka )

  • कार्ला फाटा येथील या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक सहभागी झाले होते. तसेच आंदोलकांनी काहीकाळ रस्त्यावर ठिय्या मांडल्याने महामार्गावर चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक आणि लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांंच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनावेळी कुठल्याही अनुचित घटना घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मराठा समाजाला शिक्षण व नोकरी मध्ये 10 टक्के आरक्षणाचा कायदा महाराष्ट्र शासनाने विशेष अधिवेशनात केला असला तरीही सकल मराठा समाजाची मूळ मागणी असलेल्या सगे सोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कायदा मंजूर करत मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळावा, या मागणीसाठी लोणावळा शहर व ग्रामीण भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने कार्ला फाटा येथे हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अधिक वाचा –
– लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र संस्थेला ‘दुर्ग रत्न’ पुरस्कार, सामाजिक कार्यातील उल्लेखनीय अन् आदर्शवत कार्यासाठी शिवदुर्गचा गौरव । Lonavala News
– अत्यंत महत्वाचे! पुणे-सोलापूर, पुणे- सातारा, पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग हद्दीतील अनधिकृत व्यवसाय काढून घेण्याचे आवाहन
– पुणे जिल्ह्यातील जलरथाला हिरवा झेंडा; विविध योजनांची माहिती देण्यासाठी 13 तालुक्यातील 1 हजार 843 गावांतून फिरणार चित्ररथ


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची मासिक सभा संपन्न; संघटनेला बळकट करण्यासाठी हंगामी कार्यकारिणी जाहीर, वाचा अधिक

Next Post

‘पोक्सो’ कायदा आणि ‘निर्भया’ योजनेबद्दल कान्हे शाळेतील विद्यार्थ्यांना वडगाव मावळ येथील पोलिस अधिकाऱ्यांकडून सखोल मार्गदर्शन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kanhe-School-maval

'पोक्सो' कायदा आणि 'निर्भया' योजनेबद्दल कान्हे शाळेतील विद्यार्थ्यांना वडगाव मावळ येथील पोलिस अधिकाऱ्यांकडून सखोल मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.