Dainik Maval News : विधानसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. मावळ तालुक्यात राजकीय महानाट्य सुरु असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. महायुतीतील इच्छुक उमेदवारांकडून बैठका, गाठीभेटी आणि पत्रकार परिषदांचा सपाटा सुरू आहे. सोमवारी (दि.21) दुपारी आमदार सुनिल शेळके यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर तातडीने रविंद्र भेगडे यांनीही पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ‘आमचं ठरलंय..’ असा भाषेत विधानसभा निवडणूक लढविण्याचे सुप्त संकेत दिले. सोबत काही महत्वाच्या मुद्द्यांवरही भाष्य केले.
पक्षाने दिलेली समन्वयक पदाची जबाबदारी नाकारली…
रविंद्र भेगडे यांनी सोमवारी रात्री तळेगाव येथील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच एक महत्वाची माहिती माध्यमांना दिली. भेगडे यांना यंदाच्या विधानसभा निवडणूकीसाठी पक्षाने देऊ केलेले ‘मावळ विधानसभा समन्वयक’ ह्या पदाची जबाबदारी भेगडे यांनी स्विकारली नाही. रवी भेगडे यांनी पक्षाने देऊ केलेली ही नवी जबाबदारी नाकारली असून पक्षाने आता अशा पद आणि जबाबदाऱ्यांऐवजी मी उमेदवारी मागत आहे, ती उमेदवारी द्यावी, अशी स्पष्टोक्ती भेगडेंनी दिली.
आगामी मावळ विधानसभा निवडणूकीमध्ये पक्षाने मला मावळ विधानसभा समन्वयक पदाची जबाबदारी देण्यापेक्षा उमेदवारी द्यावी, मी पक्षाची ही जबाबदारी विनम्रपणे नाकारतो, असे रविंद्र भेगडे यांनी सांगितले. यावळी पत्रकार परिषदेत भेगडे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 2 ऑगस्ट रोजी कार्यकर्ता मेळावा झाला होता, त्या मेळाव्याची आठवण करून देत त्यांनी आपला अर्थात कार्यकर्त्यांचा निर्णय झाला असल्याचे सांगत, लवकरच भुमिका स्पष्ट करणार असल्याचेही सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भाजपाची पहिली यादी जाहीर ! मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला ? सुनिल शेळकेंच्या उमेदवारीचा मार्ग जवळपास मोकळा
– राष्ट्रवादीच्या पहिल्याच यादीत सुनिल शेळकेंचे नाव असणार, ‘या’ 6 कारणांमुळे अजितदादा शेळकेंना दुसऱ्यांदा उमेदवारी देणार